Constable: क्रिकेटच्या सामान्यावरून वाद! सरकारी शाळेतील शिक्षकानं पोलीस कॉन्स्टेबलला संपवलं

Teacher Kills Policeman: उत्तर प्रदेशातील बागपत येथे क्रिकेट वादातून पोलीस अजय पनवार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी शिक्षक असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
chool teacher kills UP police constable
chool teacher kills UP police constableSaamTV News
Published On

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. क्रिकेट सामान्यावरून झालेल्या वादातून एका युपी पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षकाने हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं असून, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रविवारी सायंकाळी सुंहेडा गावातील काही तरूण मैदानावर क्रिकेट सामना खेळत होते. यादरम्यान, कॉन्स्टेबल अजय पनवार यांचा गावातील एका सरकारी शिक्षकासोबत वाद झाला. त्यानंतर कॉन्स्टेबलसोबत असलेल्या तरूणांनी त्यांना शांत केलं. रात्री साडेदहाच्या सुमारास अजय घराबाहेर उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्यानंतर ते लगेच जमिनीवर कोसळले. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील लोक तातडीने अजय यांच्या घराजवळ गेले.

chool teacher kills UP police constable
Beed Accident: मध्य रात्रीत भररस्त्यावर वाद, दुचाकीला महागड्या गाडीने उडवलं; रस्त्यावर रक्ताचा सडा, बीडमध्ये खळबळ

अजय यांच्यावर गोळी शिक्षकाने घातली असून, गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अजय यांना उपचारासाठी रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गावकऱ्यांनी शिक्षक आणि कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या भांडणाची माहिती कुटुंबाला दिली. कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

chool teacher kills UP police constable
Sindhudurg: भीषण अपघातात दोन्ही ST बसचा चुराडा, समोरासमोर धडक अन् १०० फुटापर्यंत फरपटत नेलं

कॉन्स्टेबल अजय रजेवर घरी आले होते

अजय पनवार हे यूपी पोलिसांत कॉन्स्टेबल आहेत. ते सध्या सहारनपूर जिल्ह्यात तैनात होते. अजय पनवार रविवारी आपल्या घर रजेवर आले होते. दरम्यान वादामुळे सरकारी शिक्षकाने गोळीबार करत त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com