
जयपूरमधील एका 5 स्टार हॉटेलमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका कपलचा शारीरसंबंध ठेवतानाचा हा व्हिडीओ आहे. हे कपल खिडकीला पडदे लावायचे विसरले आणि त्यांचा शरीरसंबंधाचा व्हिडीओ व्हायरल झाला. जयपूरमधील सिव्हिल लाईन्स येथील एका 5 स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली. या हॉटेलमध्ये एक कपल एकमेकांसोबत खासगी क्षण घालवत होते. या कपलने प्रायव्हसिची काळजी घेतली नाही त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घडलं असं की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये या 5 स्टार हॉटेलमधील एका खोलीमध्ये हे कपल शरीरसंबंध ठेवत होते. या कपलने खोलीची लाइट चालूच ठेवली होती. महत्वाचे म्हणजे ते खिडकीला पडदे लावायला विसरले. हॉटेलच्या खिडकीवर पडदे नसल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना या कपलचे शरीरसंबंध ठेवतानाचे क्षण स्पष्टपणे दिसत होते. जेव्हा काही लोकांनी या निष्काळजी कपलला पाहिले तेव्हा हळूहळू या हॉटेलच्या समोर असलेल्या फ्लाय ओव्हरवर गर्दी जमली. बघ्यांनी या ठिकाणी इतकी गर्दी केली होती की मोठी वाहतूक कोंडी झाली.
हॉटेलसमोर उभ्या असलेल्या लोकांना या कपलच्या खासगी क्षणाच्या सर्व कृती स्पष्टपणे दिसत होत्या. काहींनी आपल्या मोबाईलमध्ये या कपलचे शरीरसंबंध ठेवतानाचे क्षण कैद केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकऱ्यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
हॉटेलच्या खिडकीच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या त्यामुळे या कपलला वाटले असेल की बाहेरच्यांना काहीच दिसत नसावे. त्यांनी खडक्यांना पडदे लावले देखील नव्हते. हे कपल एकमेकांमध्ये इतके मग्न होते की त्यांना बाहेरून कुणी बघत आहे याचे देखील भान नव्हते. सुदैवाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. ज्यांनी या कपलचे व्हिडीओ काढले ते त्यांनी काही क्षणात सगळीकडे व्हायरल होते.
जयपूरमधील हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्स देखील प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. काही युजर्स या कपलला त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तर काहींनी यासाठी हॉटेल व्यवस्थापनाला जबाबदार धरले. त्याचवेळी काही लोकांनी असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांनाही दोषी ठरवले आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.