Momos खाणाऱ्यांनो सावधान! फ्रीजमध्ये कुत्र्याचं मुंडकं,भांड्यांमध्ये दिसलं मांस, फॅक्टरीतील दृश्यानं खळबळ

Dog Chopped Head Found In Momoj Factory: मोमोज बनवणाऱ्या एका फॅक्टरीत कापलेलं कुत्र्याचं डोकं आणि काही मांसाचे तुकडे आढळले आहेत. महानगरपालिकेच्या पथकाने छापा मारल्यानंतर फॅक्टरीतील हा प्रकार उघडकीस आलाय.
Momoj Factory
Dog Chopped Head Found In Momoj FactorySaam Tv
Published On

तुम्ही फास्टफूड खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला फास्टफूडमध्ये मोमोज खाणं आवडत असेल तर सावधान! तुम्ही मागवलेल्या मोमोजमध्ये कोंबडीचेच मांस आहे का? तुमच्यासमोर मोमोज बनवली आहेत क? ही प्रश्न विचारण्यामागे कारण ठरलंय, पंजाबच्या मोहालीत उघडकीस आलेला प्रकार.

येथील एका मोमोज बनवण्याच्या फॅक्टरीत कुत्र्याचं कापलेलं मुंडकं आढळून आलंय. मोहाली महानगरपालिकेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आलाय.

मोहालीमधील मोमोजच्या फॅक्टरीमध्ये असलेल्या फ्रीजमध्ये कुत्र्याचं कापलेलं मुंडकं आढळलंय. त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. या मोमोजच्या फॅक्टरीमध्ये असलेल्या काही भांड्यांमध्ये मांसचे काही तुकडे आढळले आहेत. या सर्व प्रकारामुळे मोठी खळबळ उडालीय. या फॅक्टरीमधून मोमोज इतर दुकानात वितरीत केली जातात. तेथील काही भांड्यांमध्ये मांस आढळले आहेत. हे मांस कुत्र्याचेच असल्याचं सांगितले जात आहे. कारण महापालिकेच्या पथकाला कुत्र्याचे धड तेथे आढळून आले नाहीये.

Momoj Factory
Viral Video: स्वॅगच हटके! माकडाने मोबाईलच्या बदल्यात जे घेतलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

यासर्व प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फॅक्टरीमध्ये आढळलेले मांसचे तुकडे आणि कुत्र्याचं डोकं जप्त करण्यात आले आहे. पथकाने ते तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागाकडे पाठविण्यात आले आहे. भांड्यात सापडलेल्या मांसाचे तुकडे आणि कुत्र्याचे डोकं एकाच कुत्र्याच्या शरीराचा भाग आहे का याची खात्री या तपासणीतून केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीमध्ये मोमोज आणि स्प्रिंग रोल तयार केली जातात आणि ते अनेक ठिकाणी वितरित केली जातात.

मोहाली महापालिकेच्या पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणलाय. मांसाच्या तुकड्यांशिवाय, मोमोसोबत दिल्या जाणाऱ्या लाल चटणीचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

नेपाळी लोकांनी कुत्र्याचं मटण खाल्ला

मोहालीच्या मतौक गावात ही फॅक्टरी आहे, येथील खान बेकरी नावाच्या दुकानाच्या आवारात मोमोजची फॅक्टरी उभारण्यात आलीय. यात काम करणारे बहुतेक लोक नेपाळी आहेत. या फॅक्टरीत फ्रोजन मीट आणि क्रशर मशीनही सापडलीय. काही नेपाळी कारागिरांनी कुत्र्याला कापून खाल्ल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ व्हायरल

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फॅक्टरी दोन वर्षांपासून चालू आहे. परंतु खराब जागेवर खाण्याचे पदार्थ बनवली जात असल्याने येथील नागरिकांनी याचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हाच व्हायरल व्हिडिओ पाहून येथील महापालिकेने कारवाई करत फॅक्टरीवर छापा टाकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com