

ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांचा त्या ६ फुटीर खासदारांमध्ये समावेश नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. या दोन्ही खासदारांनी सहीच केली नाही, असा आमचा ठाम विश्वास असल्याचे संजय राऊत म्हणाले. दिल्लीमध्ये संसदीय बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली.
आम्ही जे काय करतोय, ते कायद्याला धरून आणि उघड करत असल्याचे राऊत यांनी सांगितले. बैठकीला उपस्थित नसणाऱ्या सर्व खासदारांना कायदेशीर नोटीस पाठवली जाईल, अशी माहिती यावेळी राऊतांनी दिली. त्याशिवाय फुटीर खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दाखवावे असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
"बैठकीला हजर न राहिल्यामुळे आम्ही सर्व ६ खासदारांना नोटीस पाठवणार आहोत. नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसांत उत्तर मिळाले नाही, तर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. त्याबाबत आम्ही लोकसभा अध्यक्षांनाही पत्र लिहिणार आहोत," असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
"ओमराजे निंबाळकर पुण्यात आहेत, तर संजय दिना पाटील मुंबईत आहेत. हे दोन्ही खासदार दिल्लीला आलेले नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. बैठकीला ते खासदार का आले नाहीत? हे पाहावे लागेल. शिंदेंनी त्यांना किडनॅप (अपहरण) केले आहे का? त्यांच्या जीवाला धोका आहे का? हे पाहावे लागेल," असे संजय राऊत म्हणाले.
"खासदारांना ही बेईमानी महागात पडेल. रविवारी सर्वजण सोबत होते, पण आज ते बेपत्ता आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कोणालाच माहिती नाही. हे दोन ते तीन वेळा खासदार झालेले आहेत, पण आता त्यांनी केलेली बेईमानी त्यांना महागात पडेल," असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय जाधव
भाऊसाहेब वाकचौरे
संजय देशमुख
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
संजय दिना पाटील
बैठकीला उपस्थित कोण होते?
अरविंद सावंत
राजाभाऊ वाजे
अनिल देसाई
संजय राऊत (राज्यसभा)
राज्यात होत असलेली विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर ६ खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. संसदीय बैठकीला ६ खासदार व्हिप धुडकावून उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांच्या मनात रोष निर्माण झाला असून ठिकठिकाणी आंदोलने आणि जाळपोळ केली जात असल्याचे समजतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.