Actress: 'माझे वडील मला वेश्या म्हणायचे'; वडिलांकडून त्रास अन् शिवीगाळ, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला हादरवणारा किस्सा

TV Actress Shiny Doshi Opens Up: अभिनेत्री शायनी दोशी हिने आपल्या वडिलांबाबत एक भावनिक अनुभव शेअर केला. ती फक्त १६ वर्षांची असताना तिचे वडील तिला "वेश्या" असे म्हणत अपमान करत असल्याची माहती तिने दिली.
Actress
ActressSaam
Published On

स्ट्रगल हा कोणत्याही कलाकाराला चुकलेला नाही. प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल फेसमधून जावं लागतं. ग्लॅमरच्या दुनियेतील झगमगाट खऱ्या आयुष्यातही तसाच असतो असं नाही. काहींना कुटुंबाचा आधार मिळत नाही. काहींचे कुटुंब मुलांच्या स्ट्रगल काळात साथ सोडतात. अशाच एका अभिनेत्रीने आपला स्ट्रगल काळातील वाईट अनुभवांबद्दल माहिती दिली. तसेच वडिलांच्या वाईट वृत्तीबद्दल भाष्य केलं. यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

सीरिअल्समुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शायनी दोषी. तिने अलिकडेच आपल्या वडिलांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, 'जेव्हा मी १६ वर्षांची होती, तेव्हा वडील वेश्या म्हणून शिवीगाळ करत होते', अशी माहिती तिने एका मुलाखतीत दिली.

Actress
Whatsappवर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं

शायनी म्हणते, 'माझे वडील मला वेश्या म्हणून कायम अपमान करायचे. बऱ्याचदा पॅक अप लवकर व्हायचं नाही. शुटींग २ ते ३ वाजेपर्यंत चालू असायचं. त्यावेळेस माझी आई माझ्यासोबत असायची. मी तेव्हा फक्त १६ वर्षांची होती. शुटींग करून घरी परतल्यानंतर त्यांनी माझ्या कामाचं कौतुक किंवा माझी विचारपूस कधी केली नाही. नेहमी शिवीगाळ करायचे. रात्री अपरात्री तू मुलीला बाहेर घेऊन जातेस. मुलीला वाईट कामाला लावतेस का? असं आईला म्हणायचे.

Actress
Saturday Nightला बिल्डरकडून रेव्ह पार्टी, मुंबईहून ४ तरूणीही बोलावल्या; पोलिसांकडून सिनेस्टाईल भंडाफोड

आता वडील हयात नाहीत. पण त्यांच्या मृत्यूच्या २ वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याशी बोलले नाही. पण या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे', असं शायनी म्हणाली.

'आयुष्यातील काही गाठी आपण सोडवू शकत नाही. पण प्रत्येक टप्प्यात आपण जीवनातून धडे घेत असतो. आज माझे वडील माझ्यासोबत नाही. पण यामुळे माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे', असं म्हणत शायनीने आपल्या भावनांना मोकळं केलं.

Actress
India-Pakistan Conflict : मुंबईत तातडीची बैठक, राज्य सरकार-संरक्षण दलात अत्यंत महत्वाची चर्चा, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com