Shimla Landslide: शिवभक्तांवर काळाचा घाला! शिमल्यात मंदिरावर दरड कोसळली...९ ठार; २०- २५ जण बेपत्ता

Shimla Shiv Temple LandSlide Update: श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या मंदिरात शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
Shimla Landslide
Shimla LandslideSaamtv
Published On

Himachal Pradesh Rain: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारी सकाळी येथील शिमला शहरात एक मोठी भूस्खलनाची घटना घडली. शिमल्यातील शिव बावड़ी मंदिर येथे हे भूस्खलन झालं असून या घटनेत आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी ढिगाऱ्याखाली 35 ते 40 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे

Shimla Landslide
Maharashtra Politics : ...तर भाजपने महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता; कळवा हॉस्पिटलमधील घटनेवर अंबादास दानवे तुटून पडले

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या मंदिरात शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मंदिरात भूस्खलनाची घटना घडली. मुसळधार पावसामुळे शिव बावडी येथील मंदिरावर दरड कोसळली. त्यामुळे मंदिरात उपस्थित २५ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

आतापर्यंत २ मुलांसह ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरितांचा शोध सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांचा सध्या शोध सुरू असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यामध्ये अडचणी येत आहेत.

Shimla Landslide
Akola Crime News: खळबळजनक घटना! माहेरी गेलेल्या विवाहितेला पतीकडून बेदम मारहाण; प्रकृती गंभीर

मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती...

हिमाचलचे मुख्यमंत्री सुकविंदर सिंग यांनी याबाबत बोलताना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सर्व जण दर्शनासाठी आले होते. सेना, पोलिस आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com