Breaking News: शेतकरी आंदोलन पुन्हा चिघळलं, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; धुमश्चक्रीत ५८ जण जखमी

Delhi Farmer Protest News: पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमा पार करण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.
Delhi Farmer Protest
Delhi Farmer ProtestSaam TV
Published On

Delhi Farmer Protest News in Marathi

केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावत हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी (२१ फेब्रुवारी) राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ सरकारविरोधात एकवटले. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमा पार करण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Farmer Protest
PM Modi Cabinet Decision : ऊस एफआरपी ते अंतराळ क्षेत्रात एफडीआय.... मोदी मंत्रिमंडळाचे ५ महत्वाचे निर्णय वाचा !

यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या तसेच रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय ५८ शेतकरी आणि १२ पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून शेतकरी आंदोलन दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पिकांना हमीभाव मिळावा, तसेच शेतीकर्ज माफ करावे यासह विविध मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारत चलो दिल्लीचा नारा दिला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी सुरू असून आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये तब्बल ४ वेळा बैठका झाल्या आहेत.

मात्र, या बैठकीतून अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्रासोबत रविवारी (१८ फेब्रुवारी) चौथ्या बैठकीतील चर्चा फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी बुधवारपासून (२१ फेब्रुवारी) पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केली. यावेळी जेसीबी, पोकलेन मशीन घेऊन शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ पोहचले.

पोलिसांनी शेतकऱ्यांनी सीमा पार करण्यापासून रोखले असता, दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत तब्बल ५८ शेतकरी जखमी झाले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय १२ पोलीस देखील जखमी झाले आहेत. शंभू सीमेवरील तणाव बघता शेतकऱ्यांनी आंदोलन दोन दिवस पुढे ढकललं आहे.

Delhi Farmer Protest
Daily Horoscope: आजचे राशिभविष्य २२ फेब्रुवारी २०२४ मेषसह मीन राशींसाठी कसा असेल गुरुवार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com