Ukraine Russia War : रशियन सैनिकांनी युक्रेनमधील पुरुष आणि मुलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप संयुक्त राष्ट्र संघटनेने आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांनी केला आहे. "महिला आणि मुलींना इतर कारणांबरोबरच समाजात अब्रू जाण्यामुळे बलात्काराची (Rape) तक्रार करणे कठीण आहे. परंतु पुरुष आणि मुलांसाठी बलात्काराची तक्रार करणे अधिक कठीण आहे," असं संयुक्त राष्ट्र संघटनेतील (United Nations) विशेष प्रतिनिधी, प्रमिला पॅटेन यांनी सांगितलं. (Special Representative of the Secretary-General on Sexual Violence in Conflict, Pramila Patten) युक्रेनमध्ये रशियन सैनिकांनी केलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये, आता पुरुष आणि मुलांना लक्ष्य केलं जात आहे. अशा प्रकरणांची आधीच चौकशी केली जात आहे, असे यूएन आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. (Sexual abuse of minors, including Ukrainian men, by the Russian military)
हे देखील पाहा -
प्रमिला पॅटन पुढे म्हणाले की, बलात्कारातून (Sexual Abuse) वाचलेल्या पुरुषांसाठी गुन्ह्याची तक्रार करणे आणखी कठीण होऊ शकते. “महिला आणि मुलींना इतर कारणांमध्ये कलंकामुळे तक्रार करणे कठीण आहे, परंतु पुरुष आणि मुलांसाठी तक्रार करणे अधिक कठीण आहे, आम्ही लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांची तक्रार करण्यासाठी अहवाल गोळा केले आहेत.
युक्रेनमधील फॉरेन्सिक तज्ञ सध्या सामूहिक दफनभूमीतील महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करत आहेत. यात त्यांना पुरावे मिळाले आहेत की, काही महिलांची हत्या करण्यापूर्वी रशियन सैन्याने त्यांच्यावर बलात्कार केला होता. लैंगिक हिंसाचारासह युद्ध गुन्ह्यांसाठी युक्रेनियन अन्वेषकांनी काही रशियन सैनिकांची ओळख पटवली आहे. दरम्यान युक्रेन-रशिया युद्धाला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनची अनेक मोठी शहरं उध्वस्त झाली आहे. हजारो लोक मारले गेले असून लाखो लोक जखमी झाले आहेत. तर अनेकांनी देश सोडत शेजारच्या देशांमध्ये आसरा घेतला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.