Seema Haider News Update: पाकिस्तानी महिला सीमा हैदर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तिची उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी केली जात आहे. यातच आता तिच्याशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन हे चार मुलांसह नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आले. त्यांनी काठमांडूमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहण्याचे सांगितले होते, ते खरं निघालं आहे.
यातच आता सीमाच्या चार मुलांबाबतचे मोठे सत्य समोर आले आहे. सचिन आणि सीमा हे हॉटेलमध्ये एकत्र आले नव्हते, तसेच ते सोबत निघालेही नव्हते. यातच सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर सीमा सचिनला भेटायला एकटी आली असती तर तिची मुलं कुठे होती? सचिन नेपाळला आला होतास तर इथे कोणासोबत राहिला? सचिनने खरे नाव लपवून हॉटेलमध्ये दुसरे नाव का लिहिले?
सीमा-सचिन काठमांडूमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलचे मालक गणेश यांनी दावा केला आहे की, उत्तर प्रदेशचा रहिवासी सचिन आणि पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर मे महिन्यात त्यांच्या हॉटेलमध्ये आले होते. (Latest Marathi News)
जवळपास सात-आठ दिवस एकत्र घालवून ते येथून निघाले होते. हॉटेलमालक सांगतात की, सचिन-सीमा बहुतेक वेळा खोलीतच राहायचे. संध्याकाळी बाहेर जायचे आणि लवकर परतायचे. हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार, सचिनने आधी येथे येऊन हॉटेल बुक केले. (Uttar Pradesh News)
त्याने सांगितले की, त्याची पत्नी सीमा दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत येईल. दुसऱ्या दिवशी सीमा आली. निघायच्या वेळी सीमा लवकर निघून गेली आणि सचिन दुसऱ्या दिवशी निघाला. फक्त सचिन आणि सीमा हॉटेलमध्ये आले. सीमाची मुले तिच्यासोबत नव्हती. सचिनने हॉटेलमध्ये शिवांश असे नाव नोंदवले होते. बिल भरण्याच्या प्रश्नावर हॉटेल मालकाने सांगितले की, सचिनने भारतीय नोटांमध्ये रोख रक्कम भरली होती.
एटीएस सीमा-सचिनची तीन दिवसांपासून करत आहे चौकशी
दरम्यान, ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे पाकिस्तानातून चार मुलांसह व्हिसाशिवाय आलेल्या सीमा हैदरची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. सीमासोबतच तिचा प्रियकर सचिन मीना, सचिनचे वडील नेत्रपाल आणि सीमा यांच्या दोन मुलांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सीमाने आपण गुप्तहेर नसल्याचं सांगितलं आणि सचिनवरील प्रेमामुळेच ती भारतात आल्याचा पुनरुच्चार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.