School Closed Tomorrow Due To Rain Alert : मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये उद्या शाळांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये उद्या शाळांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Cm Eknath Shinde On School Closed Tomorrow Due to Rain Alert
Cm Eknath Shinde On School Closed Tomorrow Due to Rain AlertSaam Tv
Published On

Cm Eknath Shinde On School Closed Tomorrow Due to Rain Alert: मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने जोरदार हजारी लावली आहे. पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. यातच मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.

तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झालीय. या सर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवारी) मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Cm Eknath Shinde On School Closed Tomorrow Due to Rain Alert
Cm Eknath Shinde on Marathwada: ‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन त्यांनी केले. (Latest marathi News)

सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Cm Eknath Shinde On School Closed Tomorrow Due to Rain Alert
Delhi Crime Viral Video: अल्पवयीन मोलकरणीवर केला अत्याचार, महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल...

एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com