Exit Poll Updates: पाच राज्यातील जनतेने कोणाला दिलाय कौल, सर्व राज्यांचा एकत्रीत पहा एक्झिट पोल

दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात आणि यासाठीच सर्व पक्षांनी या राज्यात आपलं अस्तित्व पणाला लावलं होतं. भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात उतरले होते.
Exit Poll Updates
Exit Poll UpdatesSaam TV
Published On

मुंबई : गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश (Goa, Manipur, Punjab, Uttarakhand and Uttar Pradesh) या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी संपली असून आता देशातील प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व या निवडणुकांमध्ये काय? हा प्रश्न मनातून जात नाही आणि अशातच आता देशातील प्रत्येक चॅनेल आणि प्रत्येक संस्थेने सर्वे करुन आपआपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत.

साम टिव्हीने (Saam TV) देखील सर्वे केला आहे तसाच एक सर्वे एनडीटिव्ही केला आहे. त्यांच्या सर्वे नुसार कोणत्या राज्यात कोणाचं सरकार येणार हे आपण पाहुयात. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभांवरती कोणत्या पक्षाला NDTV च्या सर्वेनुसार किती जागा भेटल्या आहेत ते खालील प्रमाणे.

Exit Poll
Exit PollNDTV

दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात आणि यासाठीच सर्व पक्षांनी या राज्यात आपलं अस्तित्व पणाला लावलं होतं. भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात उतरले होते तर काँग्रेसकडून (Congress) प्रियंका गांधी आणि राहूल गांधींनी आपल्या अस्तितवाची जाणीव भाजपला करुन दिली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठी टक्कर दिली ती अखिलेश यांदव यांनी त्यामुळेच जवळपास भाजपला मागील निवडणुकांपेक्षा यावेळी ८० ते १०० जागा कमी मिळण्याची शक्यता आहे, मात्र बहूमताचा आकडा ते पार करतील असं दिसतय. युपीत एकूण ४०३ विधानसभेच्या जागा आहेत तर बहुमतसाठी २०२ जागां लागतात. एक्झिट पोलमधूनभाजपला २४० च्या वरती जागा भाजपला मिळणार असल्याचं दाखवलं आहे.

दरम्यान पंजाबमध्ये (Panjab) शेतकऱ्यांच्या रोषाला समोर गेलेल्या भाजपला कॅप्टन अमरिंदर (Amarinder Singh) सिंग यांचा काही फायदा झाला नसून काँग्रेसला देखील आपलं आहे ते अस्तित्व टिकवता आलं नसल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, दिल्ली पाठोपाठ पंजाब देखील अरविंद केजरीवालांचा (Arvind Kejriwal) 'आप'च (AAP) पंजाब काबीज करणार असल्याच या Exit पोलमध्ये दिसत आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ जागा आहेत तर सत्तेसाठी ५९ जागांत बहुमत लागत आणि 'आप'ला ६८ जागा मिळतील असं दिसत आहे.

Exit Poll Updates
UP Exit Poll: उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणत्या पक्षाकडे? आतुरता संपवा, पहा सामचा एक्झिट पोल

तसंच गोव्यात (Goa) देखील भाजपचं आघाडीवरती दिसत असून एकूण जागा आहेत ४० तर बहुमतासाठी २१ जागांची गरज असून इथे देखील भाजपला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये जागा आहेत ६० बहुमतासाठी आवश्यक जागा ३१ तर भाजपला मिळू शकतात ३० म्हणजे इथे एकसत्ता नसली तरी भाजपला सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार आहे.

तर उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एकूण जागा आहेत ७० बहुमतासाठी लागतात ३६ तर भाजपला ३५ जागा मिळण्याची शक्यता NDTV च्या सर्वेनुसार शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com