Anantnag Encounter: अनंतनागमध्ये सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू; लपलेल्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनची मदत

Anantnag Encounter: अनंतनागच्या कोकेरनाग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल दुपारपासून चकमक चालू आहे.
Anantnag Encounter
Anantnag Encounterसंग्रहित छायाचित्र (Saam Tv)
Published On

Anantnag Encounter:

अनंतनागच्या कोकेरनाग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल दुपारपासून चकमक चालू आहे. सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना चहूबाजूने घेरलं आहे. चकमक चालू असलेल्या ठिकाणी शोध मोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,कोकेरनाग परिसरात लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी लपले असून त्यांना सुरक्षा दलानं घेरलं आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी संघटनेचा कमांडर उजैर खान देखील असल्याची माहिती सुरक्षा दलानं दिलीय. (Latest News on National)

लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलाचे छोटे क्वाड कॉप्टर आणि एक मोठे ड्रोनद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. चिनार कोर कमांडर लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि राष्ट्रीय रायफल्सचं विक्टर फोर्स कमांडर मेजर जनरल बलवीर सिंह सैनिकांचं मनोबल वाढवत आहेत. यासाठी ते चकमक होणाऱ्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

दरम्यान अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी यांना वीर मरण आले आहे. मेजर आशीष आणि कर्नल मनप्रीत सिंह यांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. तर लष्करानं २ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. तर इतर दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दलाकडून घेतला जात आहे. सुरक्षा दलाचे जवान जंगलात जाऊन दहशतवाद्याचा शोध घेत आहेत. दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेत लष्कराचं पॅरा कमांडो यांनीही भाग घेतलाय. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा जवान ड्रोन आणि श्वानपथकाची मदत घेत आहेत.

दरम्यान बुधवारी रात्री दहशतवाद्यांची शोध मोहीम थांबवण्यात आली होती. पंरतु नाकाबंदी तशीच ठेवण्यात आली होती. लष्कर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडोलमध्ये तळ ठोकलाय. संपूर्ण शोध मोहिमेवर नजर ठेवून आहेत. काही लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी दहशतवादी दिसले होते. पॅरो कमांडो पथक देखील दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे.

Anantnag Encounter
Mumbai | लष्कर ए तोयबाला मुंबईतून पैसा !;च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com