

देशात थंडीचा जोर वाढत चाललाय
जम्मू काश्मीरमध्ये हिवाळी सुट्ट्या जाहीर
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शाळांनाही सुट्ट्या
हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये थंडी वाढत आहे. थंडीमुळे विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठून शाळेत जाताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांच्या वेळादेखील बदलण्यात आल्या आहेत. सकाळी लवकर शाळा भरवणे टाळले जात आहे. त्याऐवजी ९-१० वाजता शाळा भरवली जात आहे.अशातच देशात अनेक ठिकाणी आजपासून शाळांना सुट्टी आहे. ८,९,१०,११,१२,१३ आणि १४ डिसेंबरला शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
देशात थंडीचा जोर अधिकच वाढत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये तर हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. थंडीमुळे रस्त्यावर खूप धुकेदेखील पसरले आहेत. त्यामुळे सकाळी लवकर शाळेत जाणे मुलांना सहन होत नाहीये. त्यामुळेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत शाळा बंद राहणार आहेत.
या भागातील शाळांना सुट्टी (Jammu Kashmir School Holiday List)
जम्मू- काश्मीरमधील व बर्फाच्छादित भागातील शाळांना ही विशेष सुट्टी जाहीर केली आहे. प्राथमिक ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण डिसेंबर महिना सुट्टी असणार आहे. त्यामुळे हा पूर्ण आठवडा शाळा बंद असणार आहे. वाढणारी थंडी आणि बर्फवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्गानुसार सुट्टी
बालवर्ग ते प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुट्टी असणार आहे. पहिली ते आठवीसाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद असणार आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ११ डिसेंबर ते २२ फेब्रुवारीपर्यंत सुट्टी असणार आहे.
सुरक्षिततेच्या कारणात्सव निर्णय
कडाक्याच्या थंडी जम्मू काश्मीरमध्ये तापमान उणे १० डिग्रीपर्यंत असते. या काळात मुलांना खूप थंडी वाजते. याचसोबत बर्फातून शाळा बस, वाहतूक करणे धोक्याचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश आणि राजस्थान (UP And Rajasthan School Holiday List)
उत्तर प्रदेशमधील सरकारी आणि खासगी शाळांना २० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांना १२ दिवस सुट्ट्या असणार आहे. राजस्थान सरकारने २५ डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अधिकृत हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खूप कमी तापमान असते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.