SC/ST/OBC Aarakshan: तरुणांना कंत्राटी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळणार, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

Government Job : आरक्षण केवळ ४५ किंवा त्याहून अधिक दिवसांच्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये उपलब्ध असेल.
Government Job
Government Job saam tv
Published On

Aarakshan in Government Job:

केंद्र सरकारने SC/ST/OBC साठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील SC/ST/OBC तरुणांसाठी कंत्राटी नोकऱ्यांमध्येही आरक्षणाची व्यवस्था सुरू करण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. या आरक्षणासाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

Government Job
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसान योजनेचा निधी वाढण्याची शक्यता; 2000 रुपये जास्त मिळणार?

आरक्षण केवळ ४५ किंवा त्याहून अधिक दिवसांच्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये उपलब्ध असेल. याबाबत सर्व मंत्रालयांना कळवण्यात आल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. आरक्षण पद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत आरक्षण फक्त सरकारी नोकरी किंवा शिक्षणापुरते मर्यादित होते. केंद्राच्या या निर्णयानंतर या समाजाला सरकारी नोकरी मिळणे सोपे होऊ शकते. जर ४५ दिवसांपेक्षा कमी कंत्राटी नोकरी असेल, तर त्यांना हे आरक्षण लागू होणार नाही. परंतु सरकारने दिलेली कंत्राटी नोकरी एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी केली जाते आणि हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येतो. (Latest News)

Government Job
Fake Female Sub Inspector: तोतया सब इंस्पेक्टरचं वय फक्त २३, कारनामे मात्र ऐकून व्हाल थक्क ... एडीजी, डीजीपीही चक्रावले

सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना सूचना दिल्या आहेत की ४५ दिवस किंवा त्याहून अधिक काळ चालणाऱ्या सर्व कंत्राटी नोकऱ्यांमध्ये SC/ST/OBC साठी आरक्षण दिलेले आहे याची खात्री करावी. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे, याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Government Job
PM Kisan Mandhan Yojana : सरकार देणार शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन; जाणून घ्या, वय व पात्रता

सरकारच्या निवेदनाची दखल घेत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती भाटी यांच्या खंडपीठाने रिट याचिका निकाली काढली. कोर्टाने स्पष्ट केले की या ऑफिस मेमोरँडमचे उल्लंघन झाल्यास, याचिकाकर्त्यांना भविष्यात या संदर्भात काही अडचण आल्यास, तो पुन्हा न्यायालयात जाण्यास मोकळा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com