मी कन्नड बोलणार नाही, हा भारत आहे...; एसबीआय अधिकारी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, बँकेतच राडा

SBI Officer VIDEO : सोशल मीडियावर एसबीआय अधिकारी महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बँक व्यवस्थापनानं स्पष्टीकरण दिलं आहे. ग्राहकांशी शिष्ट आणि सभ्यतेनं वागणं आमच्यासाठी सर्वतोपरी आहे, असं व्यवस्थापनानं सांगितलं. तसंच संबंधित अधिकारी महिलेची बदली करण्यात आली आहे.
कन्नड भाषेतच बोल, ग्राहकाचा आग्रह; SBI अधिकारी महिला म्हणाली, बोलणार नाही!
SBI Officer VIDEO viral on Social media social media
Published On

मुंबईसह दक्षिणेकडील राज्यांत स्थानिक आणि हिंदी भाषकांमध्ये वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता कर्नाटकातील एसबीआय अधिकारी महिलेचा व्हिडिओ देखील व्हिडिओ व्हायरल झाला असून, स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बँकेतील महिला अधिकाऱ्यानं कन्नड भाषेतच बोलावं असा आग्रह ग्राहकानं धरला. मात्र, अधिकारी महिलेनं कन्नड भाषेत बोलण्यास नकार दिला. त्यामुळं त्यांच्यात बाचाबाची झाली. बराच वेळ यावरून बँकेतच राडा झाला होता.

बेंगळुरूत सूर्यनगरमध्ये एसबीआयची शाखा आहे. या शाखेच्या कार्यालयात बँक ग्राहक आणि तेथील महिला अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. महिला अधिकाऱ्यानं माझ्याशी बोलताना कन्नड भाषेतच बोलावं, असा आग्रह बँकेत आलेल्या ग्राहकानं धरला. त्यावर कन्नडमध्ये बोललंच पाहिजे असा नियम नाही. त्यामुळं या भाषेत बोलणार नाही, असं सांगून स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. कन्नडमध्येच बोललं पाहिजे, असं तो ग्राहक वारंवार सांगत होता. पण मी कधीच कन्नड बोलणार नाही, असं त्या अधिकारी महिलेनं सांगितलं.

कन्नड भाषेतच बोल, ग्राहकाचा आग्रह; SBI अधिकारी महिला म्हणाली, बोलणार नाही!
Pune Rain: रस्ते पाण्याखाली, गाड्या वाहून गेल्या, पालिकेचे पितळ झाले उघडे|VIDEO

हे कर्नाटक आहे. त्यामुळं इथं कन्नडमध्येच बोलायला हवं, असं तो ग्राहक एसबीआयच्या अधिकारी महिलेला सांगत होता. त्यावर हा भारत आहे, असं ती महिला म्हणाली. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. एसबीआयनं या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. एसबीआय ग्राहकांच्या भावनेचा आदर करते, असं निवेदन दिलं. तसेच बँकेतील संबंधित अधिकारी महिलेविरोधात कारवाई करताना तिची बदली केली आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्स अकाउंटवर मुख्यमंत्र्यांनी पोस्ट लिहून संबंधित अधिकाऱ्यावर टीका केली. एसबीआय शाखा अधिकाऱ्याकडून कन्नड किंवा इंग्रजीत बोलण्यास नकार देणे आणि नागरिकांचा अनादर करणे खूपच निंदनीय आहे. संबंधित अधिकाऱ्याची बदली केल्याबद्दल आम्ही बँकेचं कौतुक करतो. अशा घटना पुन्हा होता कामा नयेत, असं ते म्हणाले. कर्नाटकमधील बँकांनी कन्नडमध्येच सेवा दिली पाहिजे, असं भाजप खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.

कन्नड भाषेतच बोल, ग्राहकाचा आग्रह; SBI अधिकारी महिला म्हणाली, बोलणार नाही!
Viral News: प्रेमात धोका! तरुणाने बकरीशी केले लग्न, सगळं गाव हैराण; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com