Raj Thackeray News: आम्हाला वाचवा! गुजरातच्या तरुणाने मागितली राज ठाकरेंकडे मदत; काय आहे प्रकरण?

Linkan Sokhdia Tweet: आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल, असे म्हणत या तरुणाने राज ठाकरेंना मदतीचे आवाहन केले आहे...
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSaamtv

रुपाली बडवे...

Gujrat News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पाडवा मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्यात राज ठाकरेंनी अनधिकृत मशिदी, दर्गांच्या बांधकामाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्यात त्यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम प्रश्न उपस्थित करत महापालिका आयुक्तांना यांनी महिन्याभरात त्यावर करवीर केली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठे गणपती मंदिर उभे करू, असा इशाराही दिला होता.

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने कारवाई करत हे बांधकाम तात्काळ हटवले. राहुल गांधींच्या या भाषणाने प्रभावी झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने राज ठाकरे यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Raj Thackeray News
Maharashtra Politics News: 'उद्धव ठाकरे दुतोंडी...' चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात; राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन साधला निशाणा

याबाबत अधिक माहिती अशी की, लिंकन सोखडिया (Linkan Sokhadia) नावाच्या तरुणाचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. तरुणाने ट्विट करत राज ठाकरेंना मदतीचे आवाहन केले आहे. "अहमदाबाद’चा प्रसिद्ध चांडोळा तलाव आता नामशेष झाला आहे. इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे. हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे," असे या तरुणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Raj Thackeray News
Parshuram Ghat Traffic Update : परशुराम घाटातील वाहतुक सुरु; Social Media तील पत्रामुळे उडाला गाेंधळ

या ट्विटमध्ये तो पुढे म्हणतो की, "येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक द्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल."

दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची काल भेटी झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संंजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र ही सधू माधूची भेट असल्याचे सांगत या भेटीवर टीका केली आहे. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com