Saudi Arabia New Rules Update: सौदी अरेबियात परदेशी कामगारांसाठी नियमात बदल, भारतावर काय परिणाम होणार?

Saudi Arabia New Rules Update: सौदी अरेबियातील 'सौदी गॅजेट' च्या वृत्तानुसार, तेथील सरकारने परदेशी घरगुती कामगारांच्या व्हिसा नियमात कठोरता आणली आहे.
Saudi Arabia New Rules Update
Saudi Arabia New Rules UpdateThe Japan Times

Saudi Arabia New Rules News:

सौदी अरेबियातील काम करणाऱ्या परदेशी घरगुती कामगारांच्या नियामात मोठा बदल करण्यात आला आहे. सौदी अरेबियातील 'सौदी गॅजेट' च्या वृत्तानुसार, तेथील सरकारने परदेशी घरगुती कामगारांच्या व्हिसा नियम कडक केले आहेत. (latest Marathi News)

सौदी अरेबियाच्या नव्या नियमानुसार, अविवाहित पुरुष किंवा महिलांना घरगुती कामावर ठेवण्यास अडचण येणार आहे. आता सौदी अरेबियात अविवाहित व्यक्ती २४ व्या वयानंतर घरात घरगुती कामासाठी परदेशी कामगार ठेवू शकतो. सौदी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता झाल्यावरच या घरगुती परदेशी कामगारांना व्हिजा मिळणार आहे.

सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण भारतातून मोठ्या संख्येने नागरिक सौदी अरेबियात कामासाठी जातात. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातून २६ लाख भारतीय नागरिक हे सौदी अरेबियात कामासाठी जातात. सौदी अरेबियाच्या नव्या नियमानुसार २४ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांच्या घरी परदेशी घरगुती कामगारांना काम करता येणार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीडिया वृत्तानुसार, सौदी अरेबियात Musaned प्लॅटफॉर्मची स्थापन करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकार, कर्तव्य आणि तसेच कामगारांच्या संबंधित कामाबाबत माहिती दिली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कामगारांना व्हिसाबाबत माहिती दिली जाणार आहे.

तसेच या माध्यमातून एसटीसी पे आणि Urpay माध्यमातून कामगारांना वेतन ट्रान्सफर करण्याच्या सुविधा आहेत. तसेच या माध्यमातून घरगुती कामगारांच्या तक्रारीचं निवारण देखील करण्यात येणार आहे.

Saudi Arabia New Rules Update
Uttarkashi Tunnel Update: ''देवाने ऐकलं..माझा मुलगा बाहेर येतोय''.. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगाराची आई झाली भावुक

घरगुती कामगारांमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये नोकर, चालक, सफाई कर्मचारी, आचारी, गार्ड, शेतकरी, शिंपी, नर्स, शिक्षक यांचा सामावेश आहे. भारतातील २६ लाखांहून अधिक नागरिक सौदी अरेबियात कामासाठी जातात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com