Ukraine Airport: युक्रेनमधील विमानतळावर हवाई हल्ला, 9 जणांचा मृत्यू !

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) सुरु असलेल्या युद्धात युक्रेनच्या विमानतळावर हवाई हल्ला करण्यात आल्याची बातमी आहे.
Air Strike
Air Strike Twitter
Published On

नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) सुरु असलेल्या युद्धात युक्रेनच्या विमानतळावर हवाई हल्ला करण्यात आल्याची बातमी आहे. एएफपीने युक्रेनच्या बचावकर्त्यांचा हवाला देत असे म्हटले आहे की, या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील विनितसिया येथील विमानतळावर हा हवाई हल्ला झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सतत युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियन लष्कराने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत.

या युद्धाच्या सुरुवातीपासून युक्रेन आणि रशियामध्ये आतापर्यंत दोनदा चर्चा झाली आहे, मात्र अद्यापपर्यंत दोन्ही देशांदरम्यान युद्धविरामानंतरही काही चर्चा झालेली नाही.

शिवाय, रशियाकडून युक्रेनच्या अनेक भागांना सतत लक्ष्य करणे सुरु आहे. अशा परिस्थितीत रशियाच्या हल्ल्यांना तोंड देत युक्रेन अजूनही स्तब्ध उभा आहे. आज मिळालेल्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागात असलेल्या शहरांमध्ये तीव्र गोळीबार केला आहे.

Air Strike
माझे "ते" विधान राज्यपालांशी जोडू नका - अजित पवार

दरम्यान, युक्रेनमधील युद्धामुळे सुमारे 1.5 दशलक्ष लोकांनी देश सोडला आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीच्या प्रमुखांनी सांगितलं की, रविवारी या स्थलांतराला युरोपमधील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट म्हटले आहे. तुर्की आणि फ्रान्सचे अध्यक्ष आणि पोप फ्रान्सिस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com