Russia vs Ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं; युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त, VIDEO

Russia Ukraine war : रशियानं युक्रेनमध्ये घुसून मोठा हल्ला केलाय... मात्र रशियानं हा हल्ला युक्रेनच्या कोणत्या शहरांवर झालाय? या हल्ल्यात युक्रेनला कसं नुकसान झालयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Russia Ukraine war
Russia Ukraine war Saam tv
Published On

रशिया-युक्रेनमधील तणाव आता दिवसेंदिवस चिघळत चाललाय... अशातच रशियानं युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य करत विध्वसंक ड्रोन हल्ला केलाय.. युक्रेनची लष्करी ताकद मोडून काढण्यासाठी रशियानं युक्रेनमधील कोणत्या शहरांना टार्गेट केलयं... पाहूयात...

युक्रेनमधील कूपियांस्कमध्ये दोन युक्रेनियन लष्करी तळांना ड्रोनने उद्धवस्त करण्यात आलेत...

खैरसनमध्ये रशियाचा मोठा बॉम्बहल्ला

रशियाकडून खार्किवमध्ये एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे उद्धवस्त

कीवमध्येही एका मोठ्या निवासी इमारतीला रशियन क्षेपणास्त्राने लक्ष्य केलयं..

दरम्यान रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरात लागलेल्या आगी विझविण्यासाठी युक्रेनचे अग्निशमन दल जीवाची बाजी लावतय.. मात्र, रशियाकडून सातत्याने होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय.. अशातच आता रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यांना युक्रेन कसं प्रत्युत्तर देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com