Viral Video : धावत्या बसमध्येच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; १३ वर्षीय मुलाने असा वाचवला प्रवाशांचा जीव

School Bus Driver Heart Attack Viral Video : गेल्या काही दिवसांपासून देशात अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली. दररोज हजारो लोक अपघातात मृत्युमुखी पडतात.
School Bus Driver Heart Attack Viral Video
School Bus Driver Heart Attack Viral Video Saam TV

School Bus Driver Heart Attack Viral Video : गेल्या काही दिवसांपासून देशात अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली. दररोज हजारो लोक अपघातात मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतात. अपघातानंतर अनेकदा लोक म्हणतात, की समोरच्या व्यक्तीची चुकी होती. पण कधी कुणाची चुकी नसतानाही अपघात होतात. काही वेळा एखादा व्यक्ती अपघातात होण्यापासून अनेकांचा वाचवतो. प्रवाशांसाठी तो देवदूतच ठरतो. अशीच काहीशी घटना एका व्हिडीओतून समोर आली आहे.  (Breaking Marathi News)

School Bus Driver Heart Attack Viral Video
Viral Video : हसत-खेळत वडिलांशी गप्पा मारत होती व्यक्ती; अवघ्या ५ सेकंदातच झाला मृत्यू, थरकाप उडवणारी घटना

एका घटनेत एका लहान मुलाने मदतीचा हात पुढे केला नसता, तर बसचाही अपघात झाला असता. जेव्हा तुम्ही या घटनेचा  व्हिडीओ (Viral Video) पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की यात बस ड्रायव्हरची अजिबात चूक नव्हती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या १३ वर्षीय मुलाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेला व्हिडीओ एका शाळेच्या बसमधील आहे. या व्हिडीओत शाळकरी मुले बसमध्ये बसलेले दिसून येत आहे. बस चालक बस चालवत असताना, अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. तो बेशुद्ध होताच, शेजारी बसलेला एक १३ वर्षांचा मुलगा स्टेअरिंगकडे धावतो आणि स्वतः बस चालवू लागतो.

बसचा चालक बेशुद्ध झाल्याचं बघताच (Heart Attack) बसमधील सर्व मुले घाबरतात आरडाओरड करतात. पण हा मुलगा स्टेअरिंग हातात घेतो, शांत राहतो आणि बसला योग्य दिशेनं नेतो. मग तो स्टेअरिंगवरून हात काढून ड्रायव्हरची छाती दाबू लागतो. बस चालताना दिसत आहे. तेवढ्यात दुसरा मुलगा येतो आणि कसा तरी बस थांबवतो. त्यामुळे इतरही अनेक मुलांचे प्राण वाचले.

काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ @Enezator या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ९५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितलं की, अचानक हृदयविकाराच्या घटना वाढत आहेत, मुलाने मदत केली हे चांगलं आहे. आणखी एकाने म्हटलं की, हा मुलगा हिरो आहे, त्याच्यामुळे इतर मुलांचे प्राण वाचले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com