Bihar News: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यदुवंश कुमार यादव यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले होते. 'ब्राम्हण हे मूळचे भारतातील नसून रशिया आणि युरोपातील अन्य देशातून आले आहेत.', असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
29 एप्रिल रोजी बिहारच्या निर्मळी जिल्ह्यात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावरील चर्चेदरम्यान आरजेडीचे माजी आमदार यदुवंश कुमार यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी अजब दावा केला आहे की, 'एकही ब्राह्मण भारताचा नाही, त्यांच्या डीएनएद्वारे हे उघड झाले आहे. हे सर्वजण रशिया आणि इतर देशांतून आले आहेत, त्यांना त्यावेळी तेथून हद्दपार करण्यात आले होते आणि त्यानंतर ते सर्वजण भारतात आले आहेत.'
यदुवंश कुमार यादव यांनी पुढे सांगितले होते की, 'आपल्या सर्वांमध्ये फूट पाडण्याचे आणि आपापसात भांडण लावण्याचे काम फक्त ब्राह्मण करत आहेत. ते आपल्यामध्ये फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला त्यांना येथून हाकलवून द्यावे लागेल.' यदुवंश कुमार यादव यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच इतर राजकीय नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.
त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार आणि माजी मंत्री नीरज बबलू म्हणाले की, 'राजदच्या नेत्यांनी त्यांचे सल्लागार मनोज झा यांना विचारावे की ते कुठून आले आहेत? फक्त मनोज झा आणि संजय झा हे त्या लोकांना नीट सांगू शकतात.' तसंच, 'ब्राह्मण हे आपल्या देशाचे रहिवासी आहेत. ब्राह्मण आपल्याला मूल्ये शिकवतात आणि आरजेडी नेते त्यांना हाकलून देण्याचे बोलतात. समाजात द्वेष पसरवणाऱ्या या लोकांना हाकलून देण्याची गरज आहे.', अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तर जेडीयू प्रवक्त्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.