POK Erupts After Nepal: नेपाळनंतर POK पेटलं, जनतेचं बंड, मुल्ला मुनीरची घाबरगुंडी

Pakistan Failure In Controlling POK: आधी श्रीलंका, अफगानीस्तान, बांग्लादेश, म्यानमार आणि नेपाळनंतर पीओकेतही असंतोषाचा भडका उडालाय.. पीओकेतील नागरिकांनी पाकविरोधात युद्ध छेडलंय.. मात्र त्याचं कारण नेमकं काय आहे?
POK Protesters Clashing with Pakistan’s Forces in Muzaffarabad
POK Protesters Clashing with Pakistan’s Forces in MuzaffarabadSaam Tv
Published On

नेपाळनंतर आता भारताच्या कुरापती काढणाऱ्या भुकेकंगाल पाकिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडलीय. POK मधील नागरिकांनी पाकिस्तानविरोधात युद्धच छेडलंय.. आणि त्यामुळेच मुल्ला मुनीरचे धाबे दणाणलेत.. याच असंतोषामुळे घाबरगुंडी उडालेल्या असीम मुनीरनं मुझफ्फराबादमध्ये नागरिकांचा असंतोष दडपण्यासाठी गोळ्या चालवण्याचे आदेश दिलेत...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असीम मुनीरच्या खुनी सैन्याविरोधात नागरिकांनी स्वातंत्र्याचा नारा दिलाय.. त्याविरोधात सैन्याने केलेल्या गोळीबारात POK तील 10 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत...त्यामुळं आता आंदोलन जास्तच चिघळलंय...

आता POK मध्ये असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ विरोधात विद्रोहाची आग आणखीच तीव्र झालीय.. मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा भडका का उडालाय? आणि POK मधील आंदोलकांनी सरकारकडे कोणत्या 38 मागण्या केल्यात..

पाकचं POK तील नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष

पाक सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी

निर्वासितांसाठीच्या 12 जागा रद्द करण्याची मागणी

वीज बिलांवर सवलत देण्याची मागणी

खरंतर 1948 पासून पाकिस्तानने POK वर अवैध कब्जा केलाय.. त्यामुळे पाकिस्तानला दणका देऊन सार्वभौम भारताचा भाग असलेला POK भारतात समावून घेण्यासाठी 1994 मध्येच संसदेनं ठराव केलाय. त्यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही POK ताब्यात घेण्याची रणनीती स्पष्ट केलीय.. 77 वर्षांपासून POK तील नागरिक अनन्वित अत्याचार सहन करत आहेत.. त्यातच आता पीओकेत असंतोष असल्यानं भारतानं अखेरचा घाव घालून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवून पीओकेचा भारतात समावेश करायला हवा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com