RBI On Adani Group : अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यानंतर बँकांवर काय परिणाम झाला? RBIने दिलं स्पष्टीकरण

अदानी समूहाला भारतीय बँकांनी दिलेल्या कर्जावर रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
RBI On Adani Group
RBI On Adani GroupSaam tv

RBI On Adani Group News : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे भारतीय बँकांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर अदानी समूहाला भारतीय बँकांनी दिलेल्या कर्जावर रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.

'आम्ही सर्व बँकांच्या व्यवहारावर लक्ष ठेवत असून बँकांच्या आर्थिक स्थिरतेसाठी सर्व बँकांवर नियंत्रण ठेवून आहोत, असं म्हणत रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटलं आहे की, 'उद्योजक समूहांना भारतीय बँकांकडून कर्ज दिल्याचं वृत्त अनेक वृत्तमाध्यमांत आलं. आम्ही बँकिंग क्षेत्राच्या पर्यवेक्षक आणि बँकाचे नियामक या नात्याने संपूर्ण बँकिंग क्षेत्रावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही प्रत्येक बँकेवर सतत लक्ष ठेवतो. जेणेकरून देशात आर्थिक स्थिरता राहावी'.

'रिझर्व्ह बँकेकडे (RBI) सेंट्रल रिपॉजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRILC) डेटाबेस सिस्टम आहे. या डेटाबेस सिस्टमद्वारे बँक (Bank) ५ कोटी हून अधिक ठेवींचा अहवाल देतात. या मार्फत आरबीआय बँकांवर देखरेख करते, असं परिपत्रकात आरबीआयने सांगितले.

RBI On Adani Group
Adani Group Latest News: अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तोडले मौन, म्हणाल्या...

'भारतीय बँकिंग क्षेत्राची स्थिती आता स्थिर आहे. बँकांना भांडवल शिल्लक, मालमत्तेची गुणवत्ता, रोख रक्कम, तरतूद आणि नफा चांगला मिळत आहे. त्यामुळे बँकांची स्थिती सध्या सृदृध आहे. बँका या रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्क या मार्गदर्शक तत्वाचं पालन करत आहे, असं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिलं आहे.

अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिली पहिली प्रतिक्रिया

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या 5 दिवसांत अदानी एंटरप्रायझेसच्या तिकीटात 49.60 टक्के घट झाली आहे. या प्रकरणावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती.

RBI On Adani Group
Modi Sarkar On Adani Group: 'आमचा याच्याशी काहीही संबंध नाही!', आदानी प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया

त्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच मौन तोडले आहे. अर्थमंत्र्यांनी एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणी एसबीआय आणि एलआयसीने निवेदन जारी केले असल्याचे म्हटले आहे. सीतारामन यांच्या प्रतिक्रियेनुसार, अदानी समूहाचे एक्सपोजर मर्यादेत आहे आणि व्हॅल्यूएशनमधअये घसरण होऊनही ते अजूनही नफ्यात आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com