Reserve Bank of India May increase Repo rate | मुंबई: देशात महागाईनं आता उच्चांक गाठला आहे. आरबीआयने अनेक प्रयत्न करूनही महागाई नियंत्रणात आलेली नाही. अशात ऑगस्टमधील महागाईचे दर डोळे पांढरेफट्ट करणारे आहेत. महागाईला काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने याआधीही रेपो रेट वाढवले. मात्र, तरीही महागाईच्या झळा कमी झालेल्या नाहीत.
ऑगस्टमध्ये महागाईचा (Inflation) दर वाढल्याने आता सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपोर्टनुसार, आरबीआयकडून (RBI) सप्टेंबरमध्ये रेपो रेट ५० बेसिस पॉइंटने वाढवले जाऊ शकते. असे झाल्यास कर्जदारांना आणि सर्वसामान्यांना मोठा झटका बसू शकतो. कारण कर्जे आणि ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते.
जुलैमध्ये महागाई दर ६.७१ टक्के होता. ऑगस्टमध्ये वाढ होऊन ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. एका वृत्तसंस्थेने काही अर्थतज्ज्ञांकडून घेतलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये महागाई दर ६.९ टक्के राहील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात अंदाजापेक्षा अधिक म्हणजेच महागाई दर वाढून तो ७ टक्क्यांवर पोहोचला. खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्याने एकूण महागाई दरात वृद्धी दिसून येत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महागाई दर वाढल्याने त्याचे परिणाम येत्या ३० सप्टेंबरला होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत दिसून येतील अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून महागाई दर उच्चांकीवर आहे. ऑगस्टमध्ये महागाई दरात वाढ दिसून आली आहे. आधीच महागाईमुळे दबावात असलेल्या एमपीसी सदस्यांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
एमपीसी बैठकीत सप्टेंबरमध्ये दोनदा २५-२५ बेसिस पॉइंटपर्यंत वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे रेपो रेट ६.४० टक्क्यांवर पोहोचेल. या आर्थिक वर्षात महागाई दर ६.७ टक्क्यांच्या सरासरीवर कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये वाढून ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जुलैमध्ये हाच दर ६.७१ टक्के इतका होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.