मला 4-4 मुलं, यात माझी काही चूक नाही, काँग्रेसमुळंच...; खासदार रवी किशन हे काय बोलून गेले?

Ravi Kishan On Population Control Bill : कॉंग्रेस सरकारने त्याचवेळी जनसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर आम्हाला चार मुले झाली नसती, असे वक्तव्य रवी किशन यांनी केलंय.
Ravi Kishan
Ravi Kishan SAAM TV
Published On

Ravi Kishan On Population Control Bill : रवी किशन हे भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओेळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच रवी किशन यांनी राजकारणातही आपली छाप पाडली असून ते गोरखपूर मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. आपल्या अभिनयासह बिंधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले रवी किशन यांनी कॉंग्रेसमुळेच आम्ही चार चार मुलांना जन्म दिला असा अजब दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारसह अनेक भाजपा नेते यासाठी आग्रही आहेत. खासदार रवी किशनही या संबंधित नेहमी आपली बाजू मांडताना दिसत असतात. याच संदर्भात बोलताना रवी किशन यांनी कॉंग्रेसने जर या आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला असता तर आम्हाला चार -चार मुले झाली नसती असा दावा केला आहे.

Ravi Kishan
Mandous Cyclone : 'मंदोस' अखेर या राज्यात धडकले; अक्षरशः थैमान घातलं, होत्याचं नव्हतं झालं...

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रवी किशन यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्रात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होणार असल्याचे सांगताना ते म्हणाले की, "मला चार मुले आहेत. या चार मुलांचे पालन पोषण करताना किती कष्ट लागतात याचा मला अनुभव आहे. माझी पत्नी आधी सडपातळ होती मात्र दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिची प्रकृती खराब होत गेली. मी त्यावेळी संघर्ष करत होतो. त्यामुळे नेहमीच शुटिंगमध्ये व्यस्त असायचो." (Latest Marathi News)

याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, "त्यावेळी कोणतीही माहिती नव्हती, परंतु आता मी माझ्या पत्नीकडे पाहतो तेव्हा वाईट वाटते. आम्हाला चार चार मुले झाली ही चूक नाही. कॉंग्रेस सरकारने त्याचवेळी जनसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर आम्हाला चार मुले झाली नसती. या कायद्यासंदर्भात कॉंग्रेसने जनजागृती न केल्यानेच भाजपा हे विधेयक आणणार आहे." दरम्यान, रवी किशन यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (National News)

Edited By - Gangappa Pujari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com