Cyclone Mandous : बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदोस चक्रीवादळ तामिळनाडूमध्ये येऊन धडकले आहे. मंदोस चक्रीवादळ ९ डिसेंबरच्या रात्री आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा आणि पद्दूचेरीच्या मधून जाणार असल्याने तमिळनाडूमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे ६ डिसेंबरला खोल दाबात रुपांतर झाले होते. हे वादळ बुधवारी चेन्नईपासून ७५० किमी दूर होते. त्याआधीच प्रशासनाने सुरक्षिततेची आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. आता हे वादळ शुक्रवारी रात्री उशिरा मामल्लापुराजवळ धडकले, ज्यामुळे राज्यामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
मंदोस चक्रीवादळाने तामिळनाडूमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात जोरदार वारा आणि वादळासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. खराब हवामानामुळे शुक्रवारी सुमारे 16 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबद्दलची माहिती देताना चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ट्विट करत १३ देशांतर्गत आणि ३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख एस.बालचंद्रन यांनी चक्रीवादळ धडकण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगितले आहे. (Mandous Cyclone)
राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावाने किनारपट्टी भागात हलका ते जोरदार पाऊसही पडला. हे विनाशकारी मंदोस चक्रीवादळ ९ डिसेंबरच्या रात्री आणि १० डिसेंबरच्या सकाळी उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशातील भागातून पुढे सरकले. यावेळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. ज्यामध्ये नुंगमबक्कम भागात विक्रमी ७ सेमी पाऊस झाला. त्याचबरोबर चेंगलपेट आणि नागलपट्टीनम भागात हलक्या पावसाची नोंद झाली. (Cyclone)
चेन्नई आणि पाँडेचेरीमध्ये १८९१ पासून २०२१ पर्यंत गेल्या १३० वर्षात १३ चक्रीवादळे येऊन धडकली आहेत. मामल्लपुरमच्या किनाऱ्यावरून जाणारे मंदोस हे १३वे चक्रीवादळ आहे. या वादळापासून बचावासाठी तमिळनाडू राज्य आपत्ती दलाच्या ४० सदस्यांसह अतिरिक्त 16, 000 पोलीस कर्मचारी आणि १५०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. सोबतच जिल्ह्यातील आपत्ती दलाच्या १२ दलांना सतर्क करण्यात आले आहे.
Edited By - Gangappa Pujari
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.