Puri Jagannath Yatra News: पुरीतील भगवान जगन्नाथ रथयात्रेत गोंधळ, 500 हुन अधिक भाविक जखमी, नेमकं काय घडलं?

Puri Jagannath Yatra News: जगन्नाथ रथ यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडलीय. येथे तीन भव्य रथ मिरवणूक काढली जाते. यातील एक असलेली तलध्वज रथ ओढताना ही घटना घडलीय.
Puri Jagannath Yatra
Puri Jagannath Yatra News:saam Tv
Published On

ओडिशातील पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडलीय. शुक्रवारी रथ ओढत असताना भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात 581 भाविक जखमी झालेत. तर काही जण गंभीर जखमी झालेत. जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील किमान ८ भाविकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही. चेंगराचेंगरीनंतर भाविक जागीच बेशुद्ध पडले. या सर्वांना तातडीने पुरीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले

पुरीमधील ग्रँड रोडवर रथयात्रेदरम्यान रथ ओढण्याच्या समारंभात भाविक जमले होते. याचवेळी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. भगवान बलभद्र यांचा तालध्वज रथ ओढत असताना ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हजारो भाविक आपली भक्ती आणि श्रद्धेपोटी तालध्वज रथाच्या दोरीला स्पर्श करतात. त्याचवेळी ही घटना घडली. काही भाविक खाली पडले. रथ अडीच किलोमीटर दूर असलेल्या गुंडिचा मंदिराकडे ओढला जातो.

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान काही लोक बेशुद्ध पडल्याचे वृत्त आहे, असे ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी याबाबत माहिती दिलीय. " जास्त आर्द्रतेमुळे एक किंवा दोन भाविक कोसळले. बचाव पथकांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले. मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यांना ग्लुकोज आणि पाणी पुरेसे पुरवले जात आहे. याची खात्री करण्यासाठी आपण आलो आहोत. ज्यांना गरज असेल त्यांना योग्य आरोग्यसेवा पुरवली जात आहे, याची खात्री करण्यासाठी रुग्णालयाला देखील भेट देणार असल्याचं महालिंग म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com