Ratan Tata News: जिद्दीचे नाव रतन टाटा! अपमान करणाऱ्या 'फोर्ड'च्या मालकाला ९ वर्षांनी धडा शिकवला, थेट जग्वार अन् लँड रोव्हर कंपनीच ताब्यात घेतली

Ratan Tata Revenge Story: फोर्ड कंपनीच्या मालकाने केलेला अपमान आणि त्यांना टाटांनी दिलेले उत्तर. अपमानाचा बदलाही इतका शांत अन् संयमाने घ्यायचाही जगाने आपली दखल घ्यावी, हेच जणू टाटांनी दाखवून दिले.
Ratan Tata News
Ratan Tata Revenge Story Saamtv
Published On

Ratan Tata Special Story: असामान्य कर्तृत्व, जिद्द आणि प्रामणिक कष्टाच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवलेले, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी आज जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यात रतन टाटांचा सिंहाचा वाटा होता. अनेकदा अपयश आले, नुकसान झाले तरीही जिद्दीने पुन्हा पेटून उठत टाटांनी आपली वाटचाल सुरु ठेवली. याचेच उदाहरण म्हणजे फोर्ड कंपनीच्या मालकाने केलेला अपमान आणि त्यांना टाटांनी दिलेले उत्तर. अपमानाचा बदलाही इतका शांत अन् संयमाने घ्यायचाही जगाने आपली दखल घ्यावी, हेच जणू टाटांनी दाखवून दिले. काय होता तो किस्सा? वाचा...

Ratan Tata News
Maharashtra Politics : विधानसभेत अजित दादांची ताकद वाढली, राष्ट्रवादीला 'त्यांनी' दिला बिनशर्त पाठिंबा!

फोर्ड कंपनीच्या मालकाकडून अपमान

१९९९ मध्ये रतन टाटा हे टाटा उद्योह समुहाचे अध्यक्ष असतानाची ही गोष्ट. टाटा कंपनीने यावेळी आपली इंडिका कार भारतीय बाजारात उतरवली होती. मात्र कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे गाडी बाजारात चालली नाही ज्यामुळे टाटांना मोठे नुकसान सहन कावे लागले. या नुकसानामुले रतन टाटा यांनी पॅसेंजर कार्सचा उद्योग विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी अमेरिकेतील फोर्ड कार्स कंपनीशी चर्चा केली. या चर्चेसाठी रतन टाटा गेले असता फोर्ड कंपनीचे मालक बिल फोर्डने त्यांचा अपमान केला.

तुम्हाला माहिती नसताना तुम्ही कार बनवण्याचा निर्णय घेतलाच कसा? मी ही कंपनी विकत घेऊन उपकार करतोय, अशा शब्दात फोर्ड कंपनीच्या मालकाने टाटांना अपमानास्पद वागणूक दिली. रतन टाटांच्या हा अपमान चांगलाच जिव्हारी लागला. मात्र याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. ते परदेशातून परत आले आणि आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष कामाकडे वळवले. त्यांच्या प्रामणिक कष्टाला फळ आले आणि २००८ मध्ये टाटा कंपनी जगभरात लोकप्रिय झाली. त्यांच्या गाड्यांना प्रचंड मागणी येऊ लागली.

Ratan Tata News
Maharashtra Politics : नगरचं राजकारण पुन्हा तापले, विखेंचा लंकेंवर हल्लाबोल; म्हणाले पराभवाने मी खचलो नाही

९ वर्षांनी घेतला बदला

दुसरीकडे टाटांचा अपमान केलेल्या फोर्ड कंपनीचे मात्र दिवस फिरले होते. टाटांची भरभराट होत असतानाच फोर्डचे मात्र दिवाळ निघाले. याचवेळी टाटांनी ९ वर्षांपूर्वीच्या अपमानाचा बदला घेण्याची योजना आखली. त्यांनी फोर्ड कंपनीकडून जग्वार आणि लँड रोवर या आलिशान गाड्यांची कंपनी विकत घेण्याची ऑफर दिली. इतकेच नव्हेतर स्वत: बिल फोर्ड अमेरिकेतून रतन टाटांना भेटण्यासाठी भारतात आले. यावेळी त्यांनी तुम्ही आमची कंपनी घेऊन उपकार करत आहात, असे म्हणत त्यांचे आभार मानले. अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या, मनाची श्रीमंती जपणाऱ्या रतन टाटांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com