Rajasthan Politics: राजस्थानात निवडणुकीआधीच काँग्रेसला जबर धक्का! बड्या नेत्यावर ईडीचे छापे, मुख्यमंत्र्यांच्या मुलालाही समन्स

Rajasthan Politics: काँग्रेसचे प्रमुख गोविंदसिंह डोटासरा यांच्या जयपूरमधील निवासस्थावर छापेमारी करण्यात आली
Rajasthan Politics
Rajasthan PoliticsSaam Digital
Published On

Rajasthan Politics

राजस्थानच्या निवडणुकीआधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाला समन्स बजावले असून २७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या जयपूरमधील निवासस्थावर छापेमारी करण्यात आली.

पेपरलीक प्रकरणात ईडी कडून छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. डोटासरा यांच्या सिकर मधील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. दरम्यान काँग्रेस नेते आरसी चौधरी यांनी भाजप सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. गोविंद सिंह डोटासरा यांची राजस्थानमधील काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये गणना होते. गहलोत यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेटमध्ये मंत्री होते. लक्ष्मणगडमधून ते तीनवेळा निवडून आले आहेत.

मुख्यमंत्री गहलोत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. २५ ऑक्टोबर रोजी काँग्रेसने गॅरंटी जाहीर केल्या आणि २६ रोजी ईडीने गोविंदसिंह डोटासरा यांच्यावर ईडीने छापे टाकले. आपला मुलगा वैभव गहलोत यांना समन्स बजावेल आहेत. यावरून तुम्ही समजू शकता. भाजप ईडीद्वारे हे छापे रोज याच्यासाठी टाकत आहे, कारण काँग्रेसकडून महिला, गोरगरीब आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळू नये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Politics
India-Canada: भारत सरकारचा मोठा निर्णय; कॅनडास्थित भारतीयांना 'या' 4 कारणांसाठी भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून ईडीच्या कारवाईबद्दल शंका व्यक्त केली होती. या संदर्भात दुपारी १२.३० वाजता गहलोत पत्रकार परिषद घेणार आहेत.

Rajasthan Politics
NCERT: मोठी बातमी, पाठ्यपुस्तकांमध्ये आता 'इंडिया' नाही 'भारत'च!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com