Proclamation of Khalistani supporters; Posters of 'Bhindrawale' flashed
Proclamation of Khalistani supporters; Posters of 'Bhindrawale' flashedTwitter/@ANI

Punjab : सुवर्ण मंदिरासमोर खलिस्तानी समर्थकांची घोषणाबाजी; 'भिंडरावाले'चे पोस्टरही झळकवले

A group of people gathers at the entrance to the Golden Temple in Amritsar : पंजाबमध्ये फुटीरतावाद्यांनी सुवर्ण मंदिरासमोर एकत्र येत भिंडरावाले याच्या फोटोसह घोषणाबाजी केली आहे.
Published on

अमृतसर, पंजाब: ऑपरेशन ब्ल्यू स्टारला (Operation Blue Star) आज ३८ वर्षे पुर्ण झाली आहे. ३८ वर्षांपुर्वा पंजाबमधील शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर (Sri Harmandir Sahib -The Golden Temple) या वास्तूच्या आत भारतीय सैन्याने खलिस्तानी बंडखोरांविरुद्ध (Khalistan Movement) सशस्त्र कारवाई केली होती. या घटनेला ३८ वर्षे झाली तरीही खलिस्तानची मागणी अजूनही सुरुच आहे. खलिस्तानी चळवळीचा अलगावादी नेता जरनैल सिंह भिंडरावाले (Jarnail Singh Bhindranwale) याच्या समर्थकांनी आज पंजाबमधील सुवर्ण मंदिर याठिकाणी भिंडरावाले याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पंजाबमध्ये (Punjab) फुटीरतावाद्यांनी सुवर्ण मंदिरासमोर एकत्र येत भिंडरावाले याच्या फोटोसह घोषणाबाजी केली आहे. सध्या पंजाब सरकारने अमृतसरमधील (Amritsar) सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (raises pro-Khalistan slogans and carries posters of Khalistani separatist Jarnail Bhindranwale opposite Golden Temple)

हे देखील पाहा -

नेमकं काय होतं ब्लू स्टार ऑपरेशन ?

१९८४ साली इंदिरा गांधी सरकारने पंजाबमधील वाढत्या हिंसक घटना रोखण्यासाठी "ब्लू स्टार ऑपरेशन"ची आखणी करुन सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. या गोळीबारात भारतीय लष्करांचे सैनिक हरमंदिर साहिबच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचले होते. गोळीबार सुरुच राहिला. शेवटी कट्टरतावादी संघटनेचं नेतृत्व करणाऱ्या भिंडरावालाचा मृतदेह सैन्याच्या हाती लागला. मग ७ जून १९८४ रोजी भारतीय लष्कराने अमृतसरच्या मंदिरातील ही कारवाई संपवली. ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची शीख कट्टरतावाद्यांनी हत्या केली. त्यात पहिली हत्या १९८४ साली केली गेली, ती होती भारताच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींची यांची, आणि दुसरी हत्या केली १९८६ मध्ये जनरल वैद्य यांची.

Proclamation of Khalistani supporters; Posters of 'Bhindrawale' flashed
मोठी बातमी! सिद्धू मुसेवालाला मारणारे दोन शूटर्स पुण्यातले; फोटोवरून पटली ओळख

इंदिरा गांधींची हत्या

ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये भारतीय लष्कराचे एकूण ८३ सैनिक मारले गेले आणि २४८ सैनिक जखमी झाले. याशिवाय ४९२ लोकांचा मृत्यू झाला आणि १,५९२ लोकांना अटक झाली. ऑपरेशन ब्लू या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या. हे ऑपरेशन म्हणजे भारतीय सैन्याचा विजय होता, पण राजकीयदृष्ट्या एक मोठा पराभव होता. या ऑपरेशनची वेळ, तयारी, अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधीना आपला जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com