Rahul Gandhi On Gujarat : भाजपचा जसा अयोध्येत पराभव झाला, तसाच या राज्यातही होणार; मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

Rahul Gandhi On Ayodhya : राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असून त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपचा जसा अयोध्येत पराभव झाला, तसाच पराभव गुजरातमध्येही होणार असल्याचं म्हटलं आहे.
Rahul Gandhi On Gujarat
Rahul Gandhi On GujaratSaam Digital

अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला तसाच गुजरातमध्येही होणार आहे. पंतप्रधान मोदींना वाराणसीत निसटता विजय मिळाला, केवळ एक लाख मतांनी ते विजयी झाले. तर अयोध्येतून निवडणूक लढले असते तर दारून पराभवाला सामोरं जावं लागलं असंत. जसा अयोध्येत भाजपचा पराभव झाला, तसाच पराभव गुजरातमध्येही होणार आहे, असं भाकीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. गुजरामधील या विजयानंतर काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi On Gujarat
Success Story : २० वर्षांपूर्वी निर्णय घेतला अन् आता आयुष्याचं सोनं झालं; मूळचे केरळचे सोजन आता यूकेमध्ये संसद गाजवणार

राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमध्ये त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही खूप त्रास सहन केला आहे, खूप लाठीचार्ज सहन केला आहे,. मी स्वत:, प्रियंका गांधी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय काँग्रेसची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. सर्वजण मिळून यांना सरकारमधून खाली खेचायचं आहे.

त्यांनी आमच्या कार्यालयावर हल्ला केला, मात्र घाबरण्याची गरज नाही. यातून त्यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे, हे आव्हान स्वीकारून गुजरातमध्ये भाजपचा पराभव करायचा आहे. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करणार आहे. संसदेत मी अयोध्येतील खासदाराला विचारले की, भाजपने निवडणुकीपूर्वी राम मंदिराची स्पापना केली.. पण अयोध्येत इंडिया आघाडीने निवडणूक जिंकली, हे कसं शक्य झालं?

Rahul Gandhi On Gujarat
Tamilnadu Crime : मायावतींच्या 'आर्मस्ट्रॉग'ला संपवलं; BSP नेत्याची घराबाहेरच ६ जणांकडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे संपूर्ण लक्ष राम मंदिर होतं. त्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेची सुरुवात केली होती. त्या रथयात्रेत नरेंद्र मोदींनी अडवाणींना मदत केली होती, असं सांगितलं जातं. मी संसदेत विचार करत होतो की त्यांनी राम मंदिराचं उद्घाटन केले आणि उद्घाटनाला अदानी-अंबानी यांना निमंत्रण दिलं. मात्र गरीब जनता दिसली नाही. अयोध्या विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, मात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अयोध्येतील कोणीही सहभागी झालं नव्हतं. कारण भाजपला अयोध्येतून राजकारण करायचं होतं. भाजपने प्रभू रामाच्या नावावर राजकारण केलं, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com