Rahul Gandhi: राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा; कर्नाटकातील निवडणुकांसाठी लिंगायत कार्ड?

Rahul Gandhi initiated into Lingayat sect in Karnataka : कर्नाटकात 2023 मध्ये निवडणुका आहेत आणि लिंगायत पंथाची मोठी व्होट बँक येथे आहे.
Rahul Gandhi initiated into Lingayat sect in Karnataka
Rahul Gandhi initiated into Lingayat sect in KarnatakaTwitter/@RahulGandhi
Published On

चित्रदुर्ग, कर्नाटक: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लिंगायत पंथाची (Lingayat Sect) दीक्षा घेतली. कर्नाटकातील (Karnataka) चित्रदुर्ग येथे एक प्रसिद्ध लिंगायत मठ आहे, जो मुरुगा मठ म्हणून ओळखला जातो.

राहुल गांधी यांनी आज येथे मठाचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती मुरुगा शरणरू स्वामीजी यांची भेट घेतली, त्यानंतर काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मठाच्या मुख्य संतांनी त्यांना इष्टलिंग दीक्षा दिली आणि नियमानुसार त्यांच्या कपाळावर भभूताचा त्रिपुंड लावला. (Rahul Gandhi Latest News)

हे देखील पाहा -

राहुल गांधींना इष्टलिंग दीक्षा दिली जात असताना, राहुल गांधी लिंगायत पंथ स्वीकारत आहेत, हा ऐतिहासिक क्षण आहे असे मठाकडून सांगण्यात आले.

लिंगायत पंथ म्हणजे काय?

लिंगायत संप्रदाय हा संत बसवण्णांच्या तत्त्वांचे पालन करणारा संप्रदाय आहे, ज्यामध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांना लिंगायत संप्रदाय स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. या प्रक्रियेअंतर्गत इष्ट लिंगाची दीक्षा घेणारी व्यक्ती लिंगायत समाजाशी संबंधित मानली जाते.

लिंगायत पंथ कसे पाळतात

इष्टलिंग दीक्षेच्या या प्रक्रियेअंतर्गत, लिंगायत संत लिंगायत संप्रदाय स्वीकारणाऱ्याला मंत्रोच्चारासह इष्टलिंग धारण करतात, त्यानंतर त्या व्यक्तीने लिंगायत संप्रदाय स्वीकारला आहे, असे मानले जाते.

इष्टलिंगाची दीक्षा घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले की, मी भाग्यवान आहे की त्यांना इष्टलिंगाची दीक्षा मिळाली आहे आणि संत बसवण्णांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी खूप उत्सुक आहे.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतली दीक्षा?

कर्नाटकात 2023 मध्ये निवडणुका आहेत आणि लिंगायत पंथाची मोठी व्होट बँक येथे आहे. कर्नाटकात लिंगायत समाज ही भाजपची मोठी व्होट बँक आहे. यामुळे निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून राहुल गांधींनी लिंगायत पंथाची दीक्षा घेतली का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com