राहुल गांधी विरोधी पक्षाशी युतीच्या तयारीत, म्हणाले PM मोदी अन् RSS...

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस पुन्हा रिंगणात उतरताना दिसत आहे.
rahul gandhi
rahul gandhiSaam Tv

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस पुन्हा रिंगणात उतरताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर भर दिला पाहिजे. काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत सांगितले. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याचे स्वरुप काय असावे या संदर्भात चर्चा सुरू असल्यचं गांधी म्हणाले. विरोधी ऐक्याशी संबंधित प्रश्नावर राहुल म्हणाले, 'जे कोणी आरएसएस आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ते कसे एकत्र यावे, त्याचे स्वरूप काय असावे, याचा विचार केला जात आहे.

rahul gandhi
Breaking: भाजपाच्या माजी नगराध्यक्षांसह मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

विरोधी पक्षांची एकजूट महत्त्वाची -राहुल गांधी

विरोधकांची एकजूट होण्याची देशाला गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस नेते म्हणाले, 'ज्या देशात शांतता आणि सलोखा नसेल, द्वेष वाढेल, महागाई वाढेल, अर्थव्यवस्था चालणार नाही, रोजगार उपलब्ध होणार नाही. देशाला मजबूत आणि सशक्त बनवायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शांतता.'' ते पुढे म्हणाले की, लोकांना धमकावून, द्वेष पसरवून आणि लोकांना मारून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येईल, असे भाजपच्या लोकांना वाटते.

'देशाची सध्या जी आर्थिक स्थिती आणि रोजगाराची स्थिती, जी भविष्यात येणार आहे, ती तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात पाहिली नसेल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. देशातील रोजगार व्यवस्था मोडकळीस आली आहे. छोटे दुकानदार आणि असंघटित क्षेत्र हे आपला कणा आहेत आणि तेही मोडकळीस आले आहेत.

चीनही रशियन मॉडेल स्वीकारत आहे- राहुल गांधी

'पंतप्रधान बाहेरच्या देशांकडे बघतात आणि म्हणतात की आपल्याला असे व्हायला हवे. आपण आधी आपल्या देशाची परिस्थिती पाहिली पाहिजे आणि मग काय करायचे ते पाहावे लागेल.'' रशिया आणि युक्रेनच्या संकटाबाबत भारताला इशारा देताना राहुल गांधी यांनी दावा केला की, रशियाने तेथे जे केले आहे, तेच चीननेही भारताबाबत केले आहे. “सरकार वास्तव स्वीकारत नाही. मी म्हणत आहे वास्तव स्वीकारा. तुम्ही तयारी न केल्यास, परिस्थिती बिघडल्यावर प्रतिक्रिया देऊ शकणार नाही.''

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com