Punjab Crime News: धारधार शस्त्राने हत्या, मृतदेह दुचाकीला बांधून फरफटत नेला; बापाच्या क्रूरतेनं पंजाब हादरलं

Father Killed Daughter: मुलगी रात्रभर बाहेर असल्याने तिच्या वडलांना फार राग आला.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

Punjab News: पंजाबमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्याच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केलीये. अतिशय भयंकर पद्धतीने त्यांनी मुलीला संपवलं आहे. या घटनेनं संपूर्ण पंजाब हादरून गेलं आहे. (Latest Marathi News)

एक रात्र दुसऱ्याच्या घरी थांबली

हत्या झालेली मुलगी (Daughter) अवघ्या १६ वर्षांची होती. ती एक रात्र बाहेर एका व्यक्तीच्या घरी थांबली होती. मुलगी रात्रभर बाहेर असल्याने तिच्या वडलांना फार राग आला. राग विकोपाला जाऊन त्याने धरदार शस्त्राने मुलीवर वार केले.

Crime News
Mumbai Crime News: महिलांशी गोड बोलायचा; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवायचा अन्... २२ महिलांचे शोषण करणाऱ्या नराधमाला अटक

मृतदेह दुचाकीने फरफटत नेला

दलबीर असं आरोपी पित्याचं नाव आहे. गुरुवारी दुपारी ही थरारक घटना घडलीये. नराधम बापाने मुलीवर धारधार शस्त्राने वार केल्यानंतर तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने क्रूरतेचा कळस गाठत आपल्या मुलीचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि संपूर्ण गावातून फरफटत नेला. यावेळी अख्खा गाव मुलीला पाहत होता.

कारण काय?

या प्रकरणी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. या क्रूरतेबाबत सांगताना पित्याने म्हटलं की, "माझी मुलगी एक रात्र बाहेर राहून आली. ती कुठे जात आहे याबाबत तिने काही सांगितलं नव्हतं. त्याची शिक्षा तिला मिळावी आणि ६वी ७ वीमध्ये शिकत असलेल्या इतर मुलींनी देखील असं करूनये म्हणून मी असं केलं."

Crime News
Andheri Crime News: सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; व्यवसायिकाला लाखोंचा गंडा, अंधेरी पोलिसांकडून दोघांना अटक

कुटुंबीयांनाही दिली होती धमकी

मुलगी दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर तिच्या पित्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आम्ही त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मुलीचा जीव वाचावा म्हणून धडपड केली. मात्र त्याने आम्हालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com