Punjab Central Jail prisoners Attack : पंजाबच्या मध्यवर्ती कारागृहाचा कैद्यांनी घेतला ताबा, पाच जिल्ह्यातील पोलिसांना केलं पाचारण

Punjab Gurdaspur Central Jail prisoners Attack : पंजाबमधील मध्यवर्ती कारागृह गुरुदासपूरमध्ये कैद्यांचे दोन गट एकमेकांना भिडल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. कैद्यांना शांत करण्यासाठी पोलीस दलाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र संतप्त कैद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला.
Gurdaspur Central Jail  prisoners Attack
Gurdaspur Central Jail prisoners AttackSaam Digital
Published On

Punjab Gurdaspur Central Jail

पंजाबमधील मध्यवर्ती कारागृह गुरुदासपूरमध्ये कैद्यांचे दोन गट एकमेकांना भिडल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. कैद्यांना शांत करण्यासाठी पोलीस दलाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र संतप्त कैद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला. यात चार पोलीस जखमी झाले आहेत. कैद्यांनी कारागृह परिसराचा ताबा घेतला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय निमलष्करी दलालाही पाचारण करण्यात आले आहे. टीव्ही ९ ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

तुरुंगाच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलीस कर्मचारी, धारिवाल पोलीस ठाण्याचे एसएचओ मनदीप सिंग, एसआय जगदीप सिंग आणि पोलीस छायाचित्रकार जखमी झाले आहेत. चार जखमी पोलिसांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मध्यवर्ती कारागृहातील वातावरण तणावपूर्ण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपासच्या पाच जिल्ह्यांतील पोलीस आणि निमलष्करी दलांना पाचारण करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारागृहात उपस्थित कैद्यांकडून बेड आणि इतर वस्तू जाळल्या जात असून गोंधळ सुरू आहे. आयजी बॉर्डर रेंज जेलमधील संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत पाच जिल्ह्यांतील पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान आहेत. कारागृहातील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र कारागृहात कैदी पोलिसांवर सातत्याने दगडफेक करत असल्याची बातमी आहे

Gurdaspur Central Jail  prisoners Attack
Lok Sabha Election 2024: पंजाबमध्ये 'आप'ची पहिली यादी जाहीर, मान सरकारमधील 5 मंत्रीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

गोपा-होशियारपुरिया टोळीत हाणामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर सेंट्रल जेलमध्ये दुपारी 12 वाजता अचानक गोपा गँगस्टर आणि प्रताप सिंह होशियारपुरिया टोळीतील एक कैदी यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. दोन गटातील वाद इतका वाढला की हाणामारी झाली. हाणामारी सुरू असल्याचे पाहून कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेले होते मात्र दोन्ही गटातील कैद्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यातूनपोलीस कर्मचारी कसेबसे जीव वाचवून बाहेर आले.

Gurdaspur Central Jail  prisoners Attack
One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट; कोविंद समितीने राष्ट्रपतींकडे सादर केला १८६२६ पानी रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com