पंजाब सरकारचे 1 महिन्याचे रिपोर्ट कार्ड जारी; 300 युनीट वीज मोफत देणार

भगवंत मान यांनी दावा केला आहे की ते आज पंजाबच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा करणार आहेत.
Bhagwant Mann
Bhagwant Mann- Saam Tv
Published On

पंजाब: भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारचा एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंजाबच्या जवळपास प्रत्येक राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रात पंजाब सरकारच्या 30 दिवसांच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आले आहे. 1 जुलैपासून पंजाबमधील लोकांना 300 युनिट मोफत वीज (Free Electricity) दिली जाईल, असा दावा या जाहिरातींमध्ये करण्यात आला आहे. ही माहिती आता आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) पंजाब राज्य प्रवक्ते नील गर्ग यांनी ट्विट करून दिली आहे. पंजाब सरकारने वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या या जाहिरातींचा दाखला त्यांनी दिला आहे. मात्र, आजपर्यंत भगवंत मान यांच्याकडून मोफत विजेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भगवंत मान यांनी दावा केला आहे की ते आज पंजाबच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा करणार आहेत. हे सूचित करते की ते पंजाबमधील प्रत्येक घराला 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करू शकतात. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेतल्याचेही मान यांनी सांगितले. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ने 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या वर्षी ही घोषणा करताना केजरीवाल यांनी मात्र दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज दिली जाईल हे स्पष्ट केले नव्हते कारण पंजाबमध्ये वीज बिल दर दोन महिन्यांनी येते.

मान यांनी घेतली केजरीवालांची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बैठकीसाठी वरिष्ठ राज्य अधिकार्‍यांना बोलावल्याच्या वृत्तावरून पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाला टीकेचा सामना करावा लागला होता. दिल्लीत जाऊन मान यांनी केजरीवाल यांची भेट घेतली आणि पंजाबमधील लोकांना 300 युनिट मोफत वीज देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली.

300 युनिट मोफत वीज देण्याची योजना तयार

मान यांनी पंजाबीमध्ये ट्विट केले आणि म्हटले की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत छान भेट झाली. लवकरच, आम्ही पंजाबच्या जनतेला आनंदाची बातमी देणार आहोत. दरम्यान, पक्षाचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकांना 300 युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्याची पंजाब सरकारची ब्लू प्रिंट जवळपास तयार झाली आहे आणि यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com