७ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, महागडी घड्याळं... DIG च्या घरात कोट्यवधींचं घबाड, VIDEO

Punjab DIG CBI Case : पंजाबचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्या घरावर सीबीआयने छापा मारला. लाच प्रकरणी त्याच्यावर कारवाई सुरु असताना हा छापा मारण्यात आला.
Punjab DIG CBI Raid
Punjab DIG CBI Raidx
Published On
Summary
  • पंजाबचे DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या घरावर CBI चा छापा.

  • लाचखोरी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानची मोठी कारवाई.

  • छाप्यात ७.५ कोटी रोख, २.५ किलो सोन्यासह अनेक गोष्टी जप्त.

CBI ने पंजाब पोलीस दलातील डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. लाचखोरीच्या आरोपांखाली भुल्लर यांना अटक केल्यानंतर पंजाब आणि चंदीगडमध्ये विविध ठिकाणी सीबीआयने छापे टाकले. या कारवाईदरम्यान त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले. तक्रारदाराविरुद्ध दाखल केलेला एफआयआर नष्ट करणे आणि पुढील पोलिस कारवाई होऊ नये यासाठी एका व्यावसायिकाकडून त्यांच्या सहकाऱ्यामार्फत लाच मागताना आणि स्वीकारताना डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना पकडण्यात आले.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या कारवाईदरम्यान, भुल्लर यांच्या छत्तीसगडमधील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले. यात ७.५ कोटी रुपयांची रोकड, अंदाजे २.५ किलो सोन्याचे दागिने आणि ब्रँडेड रोलेक्स, राडो घड्याळांसह २६ आलिशान घड्याळे यांचा समावेश आहे.

Punjab DIG CBI Raid
महिलांशी अश्लील संभाषण करतानाचा ऑडिओ लीक, World Cup जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला संघातून हाकललं

भुल्लर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनेक बँक खात्यांची कागदपत्रे, लॉकरच्या चाव्या आणि संशयित बेनामी संस्थांशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली. तसेच समराळा येथील त्यांच्या फार्महाऊसमधून चार बंदुका आणि १०० काडतुसे जप्त करण्यात आली. सीबीआयला छाप्यात १०८ दारूच्या बाटल्या, ५.७ लाख रुपये रोख आणि १७ काडतुसे सापडल्याचे म्हटले जात आहे. मध्यस्थी करणाऱ्याच्या घरातून २१ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.

Punjab DIG CBI Raid
Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

११ ऑक्टोबर रोजी पंजाब पोलीस दलातील डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्या विरुद्ध चंदीगड सीबीआय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. भुल्लर मला धमकावत होते, पैशांची मागणी करत होते, असे आरोप एका भंगार व्यापाऱ्याने केले होते. तक्रारीनुसार, भुल्लर यांनी त्या व्यावसायिकाच्या विरुद्ध खोटा खटला दाखल केला होता. तो खटला रद्द करण्यासाठी ८ लाख रुपये लाच मागितली होती.

Punjab DIG CBI Raid
महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com