UP News : बरेलीत ह्रदय पिळवटून टाकणारी दुर्घटना; झोपडीला लागलेल्या आगीत 4 चुलत बहिणींचा होरपूळून मृत्यू

UP Bareilly Fire News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात शुक्रवारी एक भीषण आणि ह्रदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवादा बिलसांडी गावात शुक्रवारी दुपारी एका झोपडीला भीषण आग लागली होती. यात चार सख्या चुलत बहिणींचा मृत्यू झाला आहे.
UP News
UP NewsSaam Digital
Published On

UP News

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात शुक्रवारी एक भीषण आणि ह्रदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवादा बिलसांडी गावात शुक्रवारी दुपारी एका झोपडीला भीषण आग लागली होती. यात चार सख्या चुलत बहिणींचा मृत्यू झाला आहे. तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी होरपळली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या चारही मुली चुलत बहिणी आहेत. आगीत एक महिलाही अडकली होती, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

5 वर्षांची प्रियांशी, 3 वर्षांची मानवी , 5 वर्षांची नयना आणि 6 वर्षांच्या नितूचा या आगीत होरपळून मृ्त्यू झाला आहे. अतिशय ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमधून हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

झोपडीशेजारी खेळत होत्या मुली

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाल घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास यांचे घर नवाडा बिलसंडी गावात आहे. त्याच्या छतावर गवत टाकण्यात आलं होतं, त्याला दुपारी आग लागली होती. हे पेटलेलं गवत झोपडीवर पडलं आणि संपूर्ण झोपडीने पेट घेतला. याच दरम्यान या चार बहिणी झोपडीजवळ खेळत होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अचानक लागल्याने या आगीत या चारही मुली सापडल्या. मुलींनी एकच आरडाओरडा सुरू केला. मुलींचा आरडाओरडा ऐकून घरातील नातेवाईक आणि शेजारी धावत बाहेर आले. त्यांनी घरातील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चारही मुली गंभीररित्या होरपळल्या होत्या. त्यातील तिघींचा जागीच मृत्यू झाला तर एकीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला आहे.

UP News
Court News : पत्नीला पतीने सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लगावणं गुन्हा ठरत नाही; न्यायालय असं का म्हणालं? जाणून घ्या

होरपळलेल्या महिलेवर शक्य तितके उपचार करण्याच्या सूचना

या भीषण अपघाताची माहिती मिळताच सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आरोग्य मंत्री ब्रिजेश पाठक यांनी बरेली येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेवर शक्य तितके उपचार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

UP News
Spacecraft Land On Moon : अमेरिकेचं पहिलं खासगी अंतराळयान उतरलं चंद्रावर; ५० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर चंद्रावर घडणार मोठ्या घडामोडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com