पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा करावी; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भारताला विनंती

दिमित्रो कुलेबा यांनी रशियावर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
Pm Modi
Pm ModiSaam Tv
Published On

रशिया युक्रेनवर (Ukraine) सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताला रशियाला (Russia) युद्ध थांबवण्यास सांगण्याची विनंती केले आहे. पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा करावी असे देखील ते म्हणाले. कुलेबा यांनी रशियावर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

पुढे ते म्हणाले, 30 वर्षांपासून युक्रेन हे आफ्रिका आणि आशियातील हजारो विद्यार्थ्यांसाठी घर होते. युक्रेनने परदेशी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली आहे. युक्रेन सरकार त्यांच्यासाठी सतत काम करत आहे. ज्या देशांचे नागरिक युक्रेनमध्ये आहेत त्यांची सहानुभूती मिळवण्याचा रशिया प्रयत्न करत असल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे.

हे देखील पहा -

परदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत रशियाने मदत केल्यास या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असेही ते म्हणाले. "मी भारत, चीन आणि नायजेरियाच्या सरकारांना विनंती करतो की त्यांनी रशियाला गोळीबार थांबवावा आणि नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी द्यावी," असे ते म्हणाले आहे.

याशिवाय रशियाशी विशेष संबंध असलेल्या भारतासह इतर देश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन करू शकतात की, हे युद्ध सर्वांच्या हिताच्या विरोधात आहे, असे कुलेबा म्हणाले. त्यांनी असा युक्तिवाद केला की संघर्ष संपवणे सर्व देशांच्या हिताचे आहे. ते म्हणाले, "भारत हा युक्रेनमधील कृषी उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. हे युद्ध असेच सुरू राहिल्यास नवीन पिकांची पेरणी करणे आपल्यासाठी कठीण होईल. जागतिक आणि भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हे युद्ध थांबवणे हिताचे आहे.

Pm Modi
Wardha: नदीत कोसळला मालवाहू मिनी ट्रक; एकाचा मृत्यू ,तर ९ जखमी 

युद्ध थांबवण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी सामान्य भारतीयांना रशियावर दबाव आणण्याचे आवाहन केले. "युक्रेन लढत आहे कारण आमच्यावर हल्ला झाला आणि आम्हाला आमच्या भूमीचे रक्षण करायचे आहे कारण पुतिन आमच्या अस्तित्वाचा अधिकार ओळखत नाहीत," असे देखील ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com