CJI UU Lalit | यू. यू. लळित देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींकडून नियुक्ती

विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून लळित यांच्या नावाची शिफारस केली होती.
CJI UU Lalit Update News
CJI UU Lalit Update NewsSAAM TV
Published On

Chief Justice of India Uday Umesh Lalit | नवी दिल्ली: यू. यू. लळित देशाचे नवे सरन्यायाधीश असतील. देशाचे सरन्यायाधीश म्हणून लळित यांच्या नावाची बुधवारी औपचारिक घोषणा करण्यात आली.

उदय उमेश लळित (UU Lalit) हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. काही दिवसांपूर्वीच विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. यू. यू. लळित यांच्या नावाची कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. तर, आज बुधवारी राष्ट्रपतींकडून यू. यू. लळित यांची नियुक्ती करण्यात आली.

CJI UU Lalit Update News
मोठी बातमी! PMLA कायद्यात कोणताही बदल नाही; अटक करण्याचा ईडीचा अधिकार कायम: सर्वोच्च न्यायालय

दरम्यान, यापूर्वी विद्यमान सरन्यायाधीश रमणा (NV Ramana) यांनी लळित यांच्या नावाची शिफारस कायदा मंत्रालयाकडे केली होती. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तर यू. यू. लळित हे २७ ऑगस्ट रोजी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. त्यांचा कार्यकाळ हा अवघ्या ७४ दिवसांचा असेल. लळित हे ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृ्त होतील.

CJI UU Lalit Update News
Supreme court। शिवसेना कुणाची हे कोर्टानं ठरवावं; चिन्हाबाबत तूर्तास निर्णय नको: सुप्रीम कोर्ट

कोण आहेत यू. यू. लळित?

उदय उमेश लळित यांनी जून १९८३ मध्ये वकिली सुरू केली. १९८३ ते १९८५ या काळात त्यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) वकिली केली. १९८६ ते १९९२ या काळात त्यांनी माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केले. २००४ मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांची वरिष्ठ वकील म्हणून शिफारस केली. लळित हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व 2 G खटल्यांमध्ये त्यांनी सीबीआयचे सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

याशिवाय त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) विधी सेवा समितीचे सदस्य म्हणूनही दोन वेळा काम केले आहे. १३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची थेट सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर मे २०२१ मध्ये त्यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com