Pope Francis Death: कोण होणार नवीन पोप? धर्मगुरू होण्याच्या शर्यतीत ५ जणांची नावे चर्चेत, कशी होते निवड?

Who will be New Pope : पोप फ्रान्सिस यांचे ८८ वर्षी निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. पोपच्या निधनानंतर धर्मगुरूच्या खूर्चीवर कोण बसणार याची चर्चा सुरू झालीय.
Pope Francis Death
Who will be New Pope
Published On

पोप फ्रान्सिस यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राण ज्योत मावळली. पोप फ्रान्सिस हे मार्च २०१३ मध्ये ते पोप झाले होते. ते १२ वर्षांपासून कॅथोलिक चर्चचे नेतृत्त्व करत होते. फ्रान्सिस यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

त्यामुळे त्यांना १४ फेब्रुवारी रोजी रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू झाल्यानंतर त्यांना डबल निनोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातून ते बरे देखील झाले होत. त्यांनी ईस्टर संडेला सेंट पीटर्स स्क्कायर येथे उपस्थिती लावली होती. त्यांनी काल अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांची भेट घेतली होती.

पोपची निवड कशी केली जाते?

पोपचा मृत्यू झाला तर त्यांच्यानंतर जे उमेदवार पोप होण्यास दावेदार असतात त्यांची अधिकृत घोषणा केली जात नाही. नव्या पोपच्या निवडीची एक खास प्रक्रिया आहे. त्याला पॅपल कॉन्क्लेव्ह म्हटलं जातं. जेव्हा पोपचा मृत्यू होतो तेव्हा कॅथोलिक चर्चचे कार्डिनल त्यांच्या जागी दुसरा पोप निवडतात.

कार्डिनल्स हे वरिष्ठ पादरी लोकांचा एक गट आहे. त्यांचे काम पोपला सल्ला देणं असतं. दरम्यान प्रत्येकवेळी या कार्डिनल्समधून पोपची निवड केली जाते. पोप होण्यासाठी कार्डिनल असणे आवश्यक नसले तरी, आतापर्यंत प्रत्येक पोप निवडून येण्यापूर्वी ते कार्डिनल राहिलेत.

Pope Francis Death
Jammu Kashmir: जम्मू -काश्मीरमध्ये ढगफुटी! महामार्ग बंद, रस्ते खचले; मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू

पोप होण्याच्या शर्यतीत ५ नावे चर्चेत

कार्डिनल पिएट्रो पारोलिन:

व्हॅटिकनच्या सत्तेतील संरचनेतील एक मोठे नाव म्हणजे कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन. हे गेल्या दशकापासून पोप फ्रान्सिसच्या सर्वात विश्वासू सहाय्यकांपैकी एक आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी २०१३ पासून व्हॅटिकन राजनैतिक आणि प्रशासनाचे नेतृत्व केलंय. त्यांचे वय ७० वर्षे आहे. ते इटलीच्या व्हेनेटो प्रदेशातील आहेत आणि या पोप निवडणूक परिषदेत तो सर्वोच्च क्रमांकाचे कार्डिनल आहेत.

कार्डिनल पीटर एर्डो:

पीटर एर्डो हे कॅथोलिक चर्चमधील एक नाव आहे जे त्यांच्या रूढीवादी आणि पारंपारिक विचारांसाठी ओळखले जाते. त्यांचे वय ७२ वर्षे आहे. २००३ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना कार्डिनल बनवलं होतं. ते युरोपमधील बिशप कॉन्फरन्स कौन्सिलचे माजी अध्यक्ष राहिलेत. कॅथोलिक परंपरांचे कट्टर समर्थक मानले जातात. घटस्फोटित आणि पुनर्विवाहित जोडप्यांना पवित्र अन्न देण्याची परवानगी ते देत नाही.

कार्डिनल मॅटेओ झुप्पी:

कॅथोलिक चर्चमधील सर्वात प्रगतीशील आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांना पोप फ्रान्सिसच्या सर्वात आवडत्या नेत्यांपैकी एक मानले जातं. त्यांचे वय ६९ वर्षे आहे. ते २०२२ पासून इटालियन एपिस्कोपल परिषदेचे अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांना कार्डिनल म्हणून नियुक्त केले होते.

कार्डिनल रेमंड बर्क:

कॅथोलिक चर्चमधील सर्वात रूढीवादी चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचे वय ७० वर्षे आहे. २०१० मध्ये त्यांना पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी त्यांना कार्डिनल बनवले. त्यांनी पोप फ्रान्सिसच्या सुधारणावादी धोरणांवर वारंवार टीका केली होती. घटस्फोटित आणि पुनर्विवाहित जोडप्यांना पवित्र अन्न परवानगी देण्यावर त्यांनी असहमती दर्शवली होती.

Pope Francis Death
Breaking News : पोप फ्रान्सिस यांचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगले:

लुइस अँटोनियो ६७ वर्षांचे आहेत. जर ते पोप म्हणून निवडले गेले तर ते इतिहासातील पहिले आशियाई पोप बनू शकतात. २०१२ मध्ये पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी त्यांना कार्डिनल बनवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com