
PM Modi : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त किल्ले रायगडावर दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठीत शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सर्वांसाठी नवी उर्जा घेऊन आला आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक अद्भुत अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य , सुशासन, समृद्धीची गाथा आजही प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण ही शिवाजी महाराजांच्या शासनव्यवस्थेची मूल तत्व होती. आज स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले रायगडाच्या प्रांगणात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आजचा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
शिवाजी महाराजांनी नेहमी एकता आणि अखंडता राखली. महाराजांनी गुलामीची मानसिकता संपवली आणि राष्ट्रनिर्माणासाठी जनतेला प्रेरित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अद्भूत होतं. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि सुशासस आजही आठवलं जातं. (Latest Marathi News)
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच स्वराज, धर्म आणि संस्कृतींवर हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवला. महाराजांचे जीवन आपल्याला प्रभावित करते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन मागील वर्षी भारतीय नौसेनेच्या ध्वजावर राजमुद्रेला स्थान दिलं. हा ध्वज आज नवीन भारताची आन, बान, शान बनून फडकत आहे. शिवाजी महाराजांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आम्हाला गर्व आहे की अनेक देश शिवाजी महाराजांच्या नितींवर चर्चा होते आणि संसोधनही होतं, असं मोदींनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.