गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचा येत्या 18 जून रोजी वाढदिवस आहे. हिराबेन 18 जूनला त्यांच्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी या दिवशी आपल्या आईची भेट घेणार असल्याची माहिती आहे. गांधीनगर येथील घरी हिराबेन यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहेत. इतकंच नाही तर या दिवशी गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचं नावही देण्यात येणार असल्याची माहिती गांधीनगरच्या महापौरांनी दिली आहे.
हिराबेन यांचा 100 वा वाढदिवस गांधीनगर येथील घरी त्यांचा राहत्या घरी साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. त्याशिवाय पीएम मोदी पावागढमध्ये 'काली माता' मंदिरात ध्वजारोहणही करणार आहेत.
दरम्यान, गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त रायसन पेट्रोल पंपाजवळील 80 मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले जाईल. त्याचे नाव येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हाच यामागचा उद्देश आहे". या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन या आपल्या धाकट्या मुलासोबत (पंकज मोदी) गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. त्यांचे पुत्र प्रल्हाद मोदी यांच्या म्हणण्यानुसार, 'हिराबेन शताब्दीकडे वाटचाल करत असताना आम्ही वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे. यावेळी मंदिरात संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.