PM Narendra Modi: मोदींनी साधला भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद, म्हणाले - 3 कोटी गरीबांना लखपती बनवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्याबाबत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiSaam Tv
Published On

PM Narendra Modi: नवी दिल्ली: अर्थसंकल्प 2022 अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्याबाबत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी या कालावधीतील अर्थसंकल्पातील उपलब्धींचा पाठाच वाचला (PM Narendra Modi Address BJP Workers After Union Budget 2022).

Pm Narendra Modi
Union Budget 2022: 2 कोटी रोजगारांच्या जुमल्यानंतर 60 लाख नोकऱ्यांचा नवा जुमला - सचिन सावंतांची टीका

100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देशाने लढा दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, देश 100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोनाच्या (Corona) या काळात जगासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. जग एका चौरस्त्यावर येऊन थांबले आहे जिथे टर्निंग पॉइंट निश्चित आहे. आपण पुढे जे जग पाहणार आहोत ते कोरोनापूर्वीचे जग राहणार नाही.

जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय

कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. याची चिन्हेही दिसू लागली आहेत. आज भारताकडे (India) पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगभरातील लोकांना भारताला अधिक मजबूत रुपात पहायचे आहे. जेव्हा संपूर्ण जग भारताकडे नव्याने पाहत आहे, तेव्हा आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Pm Narendra Modi
Nitin Raut Reaction On Budget 2022: ऊर्जा क्षेत्राची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प, नितीन राऊत यांची टीका

भारताच्या परकीय चलनाचा साठा झपाट्याने वाढला

पीएम मोदी म्हणाले की, आज भारताचा जीडीपी (GDP) 2 लाख 30 हजार कोटींच्या आसपास आहे. आज भारताचा परकीय चलन साठा 630 अब्ज डॉलरच्या झाला आहे. 2013-14 मध्ये भारताची निर्यात 2 लाख 85 हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात 4 लाख 70 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या या काळातही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अर्थसंकल्पाचा (Budget) फोकस गरीब आणि तरुणांवर आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.

3 कोटी गरीब लखपती बनवले

गेल्या 7 वर्षात आमच्या सरकारने 3 कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. आता नळाचे पाणी जवळपास 9 कोटी ग्रामीण घरांपर्यंत पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत 5 कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी सुमारे 4 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती मोदींनी दिली.

Pm Narendra Modi
Union Budget Reactions: आजचा अर्थसंकल्प म्हणजे भारताला आत्मनिर्भर आणि बलशाली बनविणारा- फडणवीस

महिलांना मालकिन बनवले

जे गरीब होते ते झोपडपट्टीत राहत होते, आता त्यांच्याकडे स्वतःचे घर (Home) आहे. या घरांसाठीची रक्कमही पूर्वीच्या तुलनेत वाढली असून मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून घरांचा आकारही वाढला आहे. मोठी गोष्ट म्हणजे यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत, म्हणजेच आपण महिलांना घराची मालकिन बनवले आहे, असंही ते म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले की, हजारो कोटी रुपयांच्या तरतुदीमुळे, विशेषत: केन-बेतवा जोडण्यासाठी, यूपी आणि मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशाचे चित्र देखील बदलणार आहे. आता बुंदेलखंडच्या शेतात आणखी हिरवळ येईल, घराघरात पिण्याचे पाणी येईल, शेतात पाणी येईल.

देशात कोणताही प्रदेश मागासलेला राहिला पाहिजे, ते योग्य नाही - मोदी

भारतासारख्या देशात कोणताही प्रदेश मागासलेला राहिला पाहिजे, ते योग्य नाही. म्हणूनच आम्ही Aspirational Districts मोहीम सुरू केली आहे. या जिल्ह्यांमध्ये गरिबांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रस्ते, वीज आणि पाण्यासाठी केलेल्या कामाचे संयुक्त राष्ट्र संघानेही कौतुक केले आहे. भारतासारख्या देशात काही क्षेत्र मागास राहिले पाहिजे, काही क्षेत्र मागे राहिले पाहिजे, ते योग्य नाही.

देशाच्या सुरक्षेसाठी आमचे सैन्य, आमचे सैनिक रात्रंदिवस काम करत आहेत, त्यांनी आपला जीव पणाला लावला आहे. पण, सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी सीमावर्ती गावेही किल्ले म्हणून काम करतात. त्यामुळे त्या सीमावर्ती गावांची देशभक्तीही अप्रतिम आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com