PM Modi : PM मोदींची व्हायब्रंट गुजरात परिषदेत गॅरंटी; म्हणाले, भारत लवकरच..

PM Modi at Vibrant Gujarat Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात समिटच्या दहाव्या आवृत्तीचं उद्घाटन केलंय. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलंय.
PM Modi
PM Modi Saam Tv
Published On

PM Modi On India Economy

भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था (India Economy) बनणार आहे, याची मी हमी देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटच्या उद्घाटन समारंभावेळी केलेल्या भाषणात म्हटलंय. शिखर परिषदेत बाहेरून आलेल्या गुंतवणूकदारांना संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्हा सर्वांना जगातील परिस्थितीची जाणीव आहे. आजच्या परिस्थितीत भारताचा विकास हा गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासकामांमुळे आहे. (latest business news)

पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, आजच्या भारतात आपण जागतिक व्यवसायासाठी पूर्वीपेक्षा चांगलं वातावरण निर्माण केलंय. आम्ही भारतात अनेक ठिकाणी एफडीआयच्या संधी खुल्या केल्या आहेत. दहा वर्षांत नवी डिजिटल क्रांती आलीय. प्रत्येक गावात स्टार्टअपची संख्या वाढतेय. आज भारतात राहण्याची सुलभता वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

13.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशातील 13.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांना सांगितले की, मी तुम्हा सर्वांना भारताच्या नव्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. आज भारतात 1.15 लाख स्टार्टअप आहेत. जगभरात डिजिटल इंडियाचा विकास (India Economy) वेगाने होतोय.

भारत आणि यूएईमधील संबंध

आज भारत आणि यूएईमधीलम संबंध अधिक घट्ट झाले आहेत. आपण येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहोत, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटलंय. पीएम मोदी म्हणाले की, हा भारताचा अमृत काळ आहे. हे अमृत काळातील पहिलं व्हायब्रंट गुजरात समिट (Vibrant Gujarat Summit) आहे. यासोबतच ते म्हणाले की, भारतातील प्रत्येक क्षेत्राचा झपाट्याने विकास होतोय. भारत आणि झेक यांच्यातील सहकार्य सतत वाढत आहे.

PM Modi
Maharashtra Economy: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य: अजित पवार

गुंतवणूकदारांना नव्या पिढीशी जोडण्याचं आवाहन

'अतिथी देवो भव:' असं आपल्याकडे म्हटलं जातं, असं पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले. व्हायब्रंट गुजरात समिट हे 'भविष्याचं प्रवेशद्वार' आहे, असं देखील ते म्हणाले. येथे तुम्ही केवळ गुंतवणूकच नाही, तर नवीन पिढीच्या कौशल्यांशी जोडून नवीन उंची गाठू शकता, असं म्हणत त्यांनी गुंतवणूकदारांना नव्या पिढीशी जोडण्याचं आवाहन केलंय. भारतातील नव्या पिढीच्या कौशल्याचा उपयोग झाला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी पीएम मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या भाषणात म्हटलंय की, तुमची जी काही स्वप्ने आहेत, ती मोदींची संकल्पना आहेत. तुमची स्वप्ने जितकी मोठी असणार तितकाच मोठा माझा संकल्पही असेल. येथे स्वप्न पाहण्यासोबतच ती पूर्ण करण्यासाठी पर्याय देखील उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय.

PM Modi
Pm Modi Shared Ram Bhajan: हरिहरन यांचं भजन ऐकून तुम्हीही श्रीरामाच्या भक्तीत व्हाल तल्लीन , PM मोदींनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com