IIT Madras News: मद्रास आयआयटीमध्ये पीएचडीच्या विद्यार्थाने संपवलं जीवन, 2 महिन्यातली तिसरी घटना

IIT Madras : मद्रास आयआयटीमध्ये विद्यार्थ्याने (IIT Student) आत्महत्या केल्याची ही गेल्या दोन महिन्यातली तिसरी घटना आहे.
IIT student end life
IIT student end lifeSaam Tv
Published On

Chennai Crime News: आयआयटी मद्रासमध्ये (IIT Madras) आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याने आपल्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे मद्रास आयआयटीमध्ये (IIT) एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, मद्रास आयआयटीमध्ये विद्यार्थ्याने (IIT Student) आत्महत्या केल्याची ही गेल्या दोन महिन्यातली तिसरी घटना आहे.

IIT student end life
Kolhapur News: बालपणाचे मित्र सकाळपासून सोबतच फिरले; दुचाकीवर गेले अन्‌ सोबतच संपविले जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव सचिन कुमार जैन (३२ वर्षे) असे आहे. सचिन मुळचा पश्चिम बंगालचा (West Bengal) रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो मद्रास इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत होता.

आत्महत्या करण्यापूर्वी सचिनने व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) स्टेटस ठेवले होते. 'मला माफ करा, मी चांगला नाही', असे स्टेटस त्याने ठेवले होते. स्टेटस पाहून सचिनच्या मित्रांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण तोपर्यंत सचिनने खोलीमध्येच गळफास लावून आत्महत्या केली होती. सचिनला या आवस्थेत पाहून त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला.

IIT student end life
Pune Crime News: ८ वर्षीय मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक अत्याचार; पुण्यातील संतापजनक प्रकार

सचिनच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषीत केले. या घटनेप्रकरणी आयआयटी मद्रासने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, 'सचिन खूप चांगला विद्यार्थी होता. त्याने अनेक शैक्षणिक पुरस्कार जिंकले होते. सचिन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये पीएचडी रिसर्च स्कॉलर होता.'

आयआयटी मद्रासने निवेदनात पुढे असे देखील सांगितले की, 'सचिन चेन्नईतील वेलाचेरी येथे राहत होता. राहत्या घरामध्येच त्याने 31 मार्च रोजी आत्महत्या केली. दीर्घ शैक्षणिक रेकॉर्ड असलेला विद्यार्थी गमावणे हे संस्थेचे मोठे नुकसान आहे.' या संस्थेने सचिनचे मित्र आणि कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला.

IIT student end life
Lata Adhikari Youtuber: धक्कादायक! युट्यूब चॅनलला सब्सक्राइबर्स कमी झाले, युट्यूबरने उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, मद्रास आयआयटीमध्ये यापूर्वी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मागच्या महिन्यात 14 मार्च रोजी एका बीटेकच्या विद्यार्थ्यांने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले होते. त्याआधी 14 फेब्रुवारी रोजी देखील एका पीजीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. गेल्या दोन महिन्यामध्ये मद्रास आयआयटीमध्ये विद्यार्थी आत्महत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com