Petrol-Diesel: महागाईचा भडका! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी वाढले, १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहेत. १ लिटरसाठी किती मोजावे लागणार वाचा सविस्तर...
Petrol-Disel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी वाढले,  १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol Diesel PriceSaam TV Marathi
Published On

Summary -

  • पेट्रोल ५ रुपये, डिझेल ३ रुपयांनी महाग झाले

  • बिहारमध्ये नवीन दर लागू

  • महागाईत वाढ होण्याची शक्यता

  • वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी चढउतार आणि कर रचनेतील बदलामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई देखील वाढली आहे. अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धादरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे सर्वासामान्यांना झटका बसला.

पेट्रोलियम कंपन्यांनी बिहारमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला. गुरूवारी बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले. या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहक आणि वाहनचालकांवर झाला आहे. नवीन दरांनुसार, पेट्रोल प्रति लिटर ५ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी वाढले आहे.

Petrol-Disel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी वाढले,  १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol: 'पेट्रोल बंद होणार' असल्याचा मेसेज व्हायरल, मध्यरात्री पेट्रोल पंपावर तोबा गर्दी; पाहा VIDEO

बिहारमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०५.३५ रुपयांवरून ११०.३५ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल प्रति लिटर ९१.५८ रुपयांवरून ९४.५८ रुपयांवर पोहचले आहे. वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे मालवाहूक आणि परिवहन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे भाडे देखील वाढण्याची शक्यता आहे.

Petrol-Disel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी वाढले,  १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol News : पेट्रोल संपलं? वाहनचालकांनी पेट्रोल पंपाबाहेर केली मोठी गर्दी, राज्यभरात कुठे काय परिस्थिती?

वाढत्या इंधन दरांचा परिणाम केवळ वाहनांपुरता मर्यादित राहणार नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार. परिणामी फळे, भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे. दरवाढीचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय आणि दैनंदिन वाहन वापरकर्त्यांवर होईल. खासगी वाहन चालक, तसेच ऑटो, बस आणि ट्रक चालाकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागेल. त्यामुळे भाडेवाढ होऊ शकते.

Petrol-Disel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी वाढले,  १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे दर बदलले, परभणी-जळगावमध्ये सर्वात महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com