'या' व्यक्तीने तब्बल 20 वर्ष पिले नाही पाणी; कारण ऐकून थक्क व्हाल

मनुष्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी असते. माणूस फक्त काही दिवस पाण्याशिवाय जगू शकतो.
Viral News
Viral NewsSaam Tv
Published On

लंडन - मनुष्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी असते. माणूस फक्त काही दिवस पाण्याशिवाय जगू शकतो. पण ब्रिटनमध्ये (Britain) राहणारा एक व्यक्ती तब्बल 20 वर्षांपासून पाणी न पिता जिवंत आहे. त्याने 20 वर्षांनंतर पहिल्यांदा पाणी प्यायले. आता हा व्यक्ती जिवंत कसा हा मोठा प्रश्न तुम्हला पडला असेल. त्याचे उत्तर असे की तो पाण्याऐवजी फक्त पेप्सी (Pepsi) प्यायचा. हा व्यक्ती 20 वर्षांपासून दररोज 30 कॅन पेप्सी प्यायचा.

नॉर्थ वेल्सचा रहिवासी असलेला 41 वर्षीय अँडी कूरी 20 वर्षांचा असताना पेप्सी प्यायला लागला. त्याला त्याचे इतके व्यसन लागले की तो पाणी पिणेही विसरला. तो दररोज सुमारे 30 कॅन पेप्सी प्यायचा. तो दरवर्षी पेप्सीवर सुमारे 7000 युरो (सुमारे 6.7 लाख रुपये) खर्च करत असे. तो दररोज सुमारे 2000 रुपये किमतीची पेप्सी प्यायचा. अँडी म्हणतो की त्याने पेप्सी पिण्यास सुरुवात केल्यापासून त्याने 219,000 पेप्सीचे कॅन विकत घेतल्या आहेत.

हे देखील पाहा -

दोन वर्षांच्या ऑनलाइन हिप्नोथेरपीनंतर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. अँडी म्हणाला, 'मला नेहमीच थंड पेप्सी पिणे आवडत होते. त्यामुळं मला त्याचे व्यसन लागले. मी दिवसातून दोन लिटर पेप्सीच्या ४-५ बाटल्या प्यायचो. मी सुपरमार्केटमध्ये काम करत असल्याने ते विकत घेऊन घरी आणणे माझ्यासाठी खूप सोपे होते.

Viral News
नॉट रिचेबल एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट चर्चेत

अँडीला बरेच दिवस कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने त्याला तब्येतीच्या समस्या सुरू झाल्या. यासह अँडीने खूप पैसे वाया घालवले आहेत. अँडी म्हणाला, 'मी दरवर्षी जितक्या पेप्सी प्यायलो, तितक्याच रकमेतून मी दरवर्षी नवीन कार खरेदी करू शकलो. मला त्याचे इतके व्यसन लागले होते. त्यानंतर त्याने पेप्सीचे व्यसन सोडण्यासाठी लंडनमधील थेरपिस्ट डेव्हिड किल्मुरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अँडीला रिस्ट्रिक्टिव फूड इनटेक डिसऑर्डर असल्याचे ओळखले. अँडीचे पेप्सीचे व्यसन ऐकून डॉक्टर देखील थक्क झाले. पेप्सीच्या व्यसनाने अँडीचे वजन वाढले होते आणि त्याला दम लागत होता, त्यामुळे त्याला बोलणे देखील कठीण झाले होते. काही थेरपी सत्रांनंतर, अँडीने पेप्सीचे व्यसन सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com