नॉट रिचेबल एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट चर्चेत

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सुरतला असल्याची माहिती समोर येत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल असून त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग...असे त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सुरतला असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपा १२३ मतं मिळाली होती. मात्र विधान परिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतं आहे. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये आहे. आज दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातं आहे.

Eknath Shinde
नागपुरात धावत्या मेट्रोमध्ये योगदिवस साजरा; नागपूर विद्यापीठाचा अभिनव उपक्रम

शिवसेनेचे संपर्कात नसलेले आमदार

1. एकनाथ शिंदे

2. शंभूराज देसाई

3. अब्दुल सत्तार

4. संदीपान भुमरे

5. भरत गोगावले

6. महेंद्र दळवी

7. संजय शिरसाठ

8. विश्वनाथ भोईर

9. बालाजी केणीकर

10. किमा दाबा पाटील

11. तानाजी सावंत

12. महेश शिंदे

13. थोरवे

14. शहाजी पाटील

15. प्रकाश आबिटकर

16. अनिल बाबर

17. किशोर अप्पा पाटील

18. संजय रायमुलकर

19. संजय गायकवाड

20. शांताराम मोरे

21. लता सोनवणे

22. श्रीनिवास वणगा

23. प्रकाश सुर्वे

24. ज्ञानेश्वर चौगुले

25. प्रताप सरनाईक

26. यामिनी जाधव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com