Paytm ने आणले मस्त फीचर! तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, कुठे पोहोचली, कळणार एकाच क्लिकवर

पेटीएमने एक नवीन फीचर आणले आहे, हे अॅप ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी फायद्याचे आहे.
Paytm
PaytmSaam Tv
Published On

नवी दिल्ली: पेटीएमने (Paytm) अॅपमध्ये अनेक नवे बदल केले आहेत. आता ट्रेन प्रवाशांसाठी, पेटीएम ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी नवे फिचर सुरू करत आहे. आता या सुविधांमध्ये आणखी विस्तार केला आहे. प्रवासी आता पेटीएम (Paytm Live Train Status) वर त्यांच्या प्रवासाची PNR स्थिती ट्रॅक करू शकतात. कोणीही आता पेटीएम अॅपचा वापर करुन ट्रेन कुठेपर्यंत पोहचली आहे, हे कळणार आहे.

Paytm
Bihar Cabinet Expansion : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारले, आता बिहारचा कॅबिनेट विस्तार कधी? स्वतः नितीश कुमार म्हणाले...

पेटीएम (Paytm) वापरकर्त्यांना अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अॅप अपडेट करावे लागणार आहे. अपडेट केल्यानंतर अॅप ओपन करुन स्क्रोल करा. शोधण्यासाठी अॅपमधील सर्ज फंक्शनमध्ये जावून शोधू शकता. पेटीएम अॅपमध्ये अनेक नव्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

Paytm
Petrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

ज्यांना सध्या ट्रेनच्या कुठे आहे हे पाहायचे आहे, त्यांच्यासाठी सुध्दा प्रक्रिया सोपी आहे. पेटीएम अॅपवर जा आणि सर्चमध्ये ट्रेनची स्थिती शोधा. पुढे पेटीएम ट्रॅव्हल उघडेल, यात तुम्ही ट्रेन, बस, फ्लाइट ट्रॅक करू शकता. तुम्हाला 'ट्रेन' पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला PNR स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस, ट्रेन कॅलेंडर आणि ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याचा सुद्धा पर्याय मिळेल.

तुम्ही ट्रेन नंबर यात टाकू शकता. आणि सर्च ऑप्शनवर टॅप करू शकता. एकदा आपण माहिती त्यात भरली की अॅपवर शेवटचे स्टेशन, प्रवासासाठी शिल्लक वेळ, प्लॅटफॉर्म तपशील, आगमन आणि प्रस्थान वेळा आणि अपेक्षित आगमन वेळ यासह सर्व प्रवास तपशील दाखवेल.

तुम्ही तुमच्या तिकीट बुकिंगची स्थिती काय आहे तपासण्यासाठी तुमचा पीएनआर नंबर त्यात भरु शकता. तुम्ही यात ट्रेन कॅलेंडर देखील पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही एका आठवड्यात धावणाऱ्या ट्रेन त्याचे वेळापत्रक, आणि शिल्लक जागांची माहिती देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com